माता वैष्णोदेवी वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात मुसलमानांना प्रवेशाच्या प्रकरणी मुख्यमंत्री अब्दुल्ला यांचे संतापजनक विधान

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – एकच प्रश्न वारंवार विचारला जातो. जर शिक्षणसंस्था धर्माधारित व्यवस्था करू इच्छित असेल, तर श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्सने अल्पसंख्याक दर्जा घ्यावा. महाविद्यालयाच्या भूमीचा खर्च स्वतः उचलावा. शासनाकडून मिळणारे अनुदान सोडून द्यावे, असे विधान जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले. भाजपच्या खासदारांच्या प्रतिनिधीमंडळाने पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे या महाविद्यालयाचे सूत्र मांडल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वर महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थ्यांना सर्वाधिक जागा देण्यावरून होणार्या विरोधावर ते बोलत होते. महाविद्यालयाच्या मैदानात ‘गुरुकुल’ उभारण्याच्या कल्पनेविषयी विचारले असता अब्दुल्ला म्हणाले की, त्यांना कुणीही रोखलेले नाही.
🔥 Twisted Logic Exposed! 🔥
🗣️ “The Mata Vaishno Devi Medical College should buy its own land and stop taking government grants” – CM Abdullah’s shocking remark while defending the large-scale admission of Muslims.
What he indirectly implies 👇
➡️ Since the govt provides land… https://t.co/wLfHFOYAAV pic.twitter.com/lDyqjb3jn5— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 4, 2025
‘नीट’नुसार प्रवेश दिला जातो !
अब्दुल्ला पुढे म्हणाले की, महाविद्यालयामध्ये प्रवेश केवळ गुणवत्तेनुसारच होतात आणि संस्थेने ‘नीट’च्या (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा देणे बंधनकारक असते) नियमांना मान्यता दिली आहे. जर धर्माच्या आधारावर प्रवेशवाटप करायचे असेल, तर त्यांना कुणी रोखत नाही; परंतु ‘नीट’मध्ये केवळ गुणवत्ता पाहिली जाते. गुणवत्तेनुसार नाव न आल्यास त्याचे दायित्व इतरांवर ढकलता येत नाही. (‘गुणवत्ता’ असलेले मुसलमान पुढे डॉक्टर झाल्यावर काय दिवे लावत आहेत, हे देहलीच्या स्फोटातून सर्व जगाने पाहिले आहे, हे ओमर अब्दुल्ला यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक)
संपादकीय भूमिकासरकार भूमी आणि अनुदान देत आहे; म्हणून हिंदूंच्या पैशाने चालवण्यात येणार्या महाविद्यालयात सर्वाधिक मुसलमान विद्यार्थी शिकणारच, असेच अब्दुल्ला यांना अप्रत्यक्ष सांगायचे आहे, हे लक्षात घ्या ! असे असेल, तर या देशात सर्वाधिक हिंदु आहेत आणि तेच सर्वाधिक कर देतात त्यामुळे संपूर्ण देशात मुसलमानांच्या संस्थांनी स्वखर्चानेच प्रत्येक गोष्ट करावी, सरकारकडून कोणतेही साहाय्य घेऊ नये, असे आता हिंदूंनी सांगितले पाहिजे ! |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !