
‘३.१०.२०२५ या दिवशी मंगळुरू (दक्षिण कन्नड, कर्नाटक) येथील पू. भार्गवराम भरत प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ८ वर्षे) हे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी मी प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीत नामजपादी आध्यात्मिक उपायांसाठी बसले होते. पू. भार्गवराम हे प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीत आल्यावर मला दैवी सुगंध आला. ‘हा दैवी सुगंध मारक स्वरूपाचा असावा’, असे मला वाटले. आरंभी हा सुगंध अधिक तीव्र होता. नंतर तो हळूहळू उणावत गेला. त्यानंतर मला तारक स्वरूपाचा दैवी सुगंध आला.

दैवी सुगंधामुळे माझ्या मनातील विचार न्यून होऊन मन नामजपावर एकाग्र झाले. ‘या दैवी सुगंधाची अनुभूती घेत रहावी’, असे मला वाटले.
पू. भार्गवराम हे खोलीतून बाहेर गेल्यानंतर काही वेळाने तो सुगंध न्यून होत नाहीसा झाला.’
– श्रीमती जयश्री भालेराव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१०.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
१४ जुलै : सनातनचे संत पू. उमेश शेणै यांचा वाढदिवस
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !