विद्यार्थिनीसमवेत गैरवर्तन करणार्‍या प्राध्यापकाला ‘श्रीराम सेना हिंदुस्थान’कडून चोप !

बेळगाव – शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रमुख म्हणून कार्यरत प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा छळ चालू होता. या संदर्भात श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित प्राध्यापकाला चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. पोलिसांनी विद्यार्थिनीकडून तक्रार घेऊन त्या प्राध्यापकावर गुन्हा नोंद केला आहे.

भविष्यात अशा कोणत्याही प्रकारच्या घटना महाविद्यालय, कार्यालय येथे घडत असतील तर युवती, महिला यांनी कोणताही संकोच न बाळगता याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्याकडे करावी, असे आवाहन संघटनेचे श्री. रमाकांत कोंडुस्कर यांनी केले आहे.