‘एकदा मी पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, आताचे वय ७ वर्षे) यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा ते ३ वर्षांचे होते. मी येणार असल्याचे त्यांना आधीच समजले होते. त्यामुळे त्यांना पुष्कळ आनंद झाला होता. त्यांच्या घरी गेल्यावर मला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. पू. वामन यांना माझ्यासह भोजन करायची इच्छा होती; म्हणून ते दुपारी २ वाजेपर्यंत जेवले नव्हते.
२. खेळण्यातील गाड्या दाखवून त्या संतांच्या असल्याचे सांगणे
पू. वामन यांनी मला त्यांची सर्व खेळणी दाखवली आणि त्यांतील परात्पर गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) गाडी दाखवली. पू. वामन परात्पर गुरुदेवांना ‘नारायण’, असे संबोधतात. ‘नारायणाची कोणती गाडी आहे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची कोणती गाडी आहे ?’, हे त्यांनी मला दाखवले. नंतर आणखी एक गाडी दाखवून त्यांनी मला सांगितले, ‘‘ही गाडी माझी आणि तुमची आहे. ही गाडी मी चालवणार आणि तुम्ही माझ्या शेजारी बसणार.’’
३. परात्पर गुरुदेवांच्या खोलीसारखी जाड पुठ्ठ्याने बनवलेली खोली दाखवणे
यानंतर त्यांनी मला त्यांच्या खोलीत नेले. तिथे विविध प्रकारची खेळणी होती. त्यांनी जाड पुठ्ठ्याची (कार्डबोर्डची) हुबेहूब परात्पर गुरुदेवांच्या खोलीसारखी बनवलेली खोली दाखवली. त्या वेळी त्यांना पुष्कळ आनंद झाला होता. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही आधी बसा. मी तुम्हाला सर्व दाखवतो.’’

४. ‘पू. वामन यांच्यात पुष्कळ आदरभाव आणि प्रेमभाव आहे’, असे मला जाणवले.
५. पू. वामन यांना सूक्ष्मातील ज्ञान पुष्कळ आहे.
६. भाव
६ अ. परात्पर गुरुदेवांप्रतीचा भाव : परात्पर गुरुदेव पू. वामन यांच्या समोर आल्यावर ते त्यांच्याकडे पहात नाहीत. मी त्यांना याचे कारण विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘गुरुदेव हे तत्त्व आणि प्रकाश आहेत. मी त्यांच्याकडे कसे पहाणार ?’’
६ आ. संतांप्रतीचा भाव : मी पू. वामन यांच्या घरून निघत असतांना ते माझ्या पाया पडले. त्यांनी मला एवढा भावपूर्ण नमस्कार केला की, माझा भाव पुष्कळ जागृत झाला.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, एम्.एस्.सी, पी.एचडी.
|
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !