|

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियाच्या ‘थिंक टँक’ (अभ्यास गट) ‘लोवी इन्स्टिट्यूट’ने सांगितले की, भारत आता ‘एशिया पॉवर इंडेक्स-२०२५’मध्ये जगातील तिसरी सर्वांत मोठी संरक्षण शक्ती बनला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील भारताच्या कामगिरीने त्याची संरक्षण क्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे त्याने जपानला मागे टाकले आहे. क्रमवारीत अमेरिका पहिल्या, तर चीन दुसर्या स्थानावर आहे. अमेरिका आशियात नसतांनाही त्याच्या मोठ्या प्रभावामुळे त्याचे नाव या सूचीत समाविष्ट करण्यात आले आहे. यासमवेतच भारत गुंतवणुकीसाठी वेगाने आकर्षक बनत आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक परदेशी गुंतवणूक भारतात येते आणि यासंदर्भात भारताने चीनला मागे टाकले आहे. याचे कारण आंतरराष्ट्रीय आस्थापनांना त्यांची पुरवठा साखळी चीनबाहेर पसरवायची आहे. हा दर्जा वेगवान आर्थिक वाढ आणि वाढत्या सैनिकी क्षमतेच्या आधारावर भारताने मिळवला आहे.
🚀 Asia Power Index 2025: India Surges Ahead 🇮🇳
India overtakes China in Foreign Investment and even surpasses Japan in Defence Capability – as per the latest data from an Australian institution.
A rising Bharat is reshaping Asia’s power balance 🌏💥
PC: @LokpahalJ pic.twitter.com/pYiH1vYCci
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 29, 2025
१. आकडेवारीनुसार वर्ष २०२४ मध्ये भारत ३९.१ गुणांसह मध्यम शक्तीच्या श्रेणीत होता. यंदा मात्र भारताचे गुण ०.९ ने वाढून ४० झाले. त्यानंतर भारत मोठ्या शक्तीच्या श्रेणीत समाविष्ट झाला.
🚨Asia Power Index 2025-
India enters into 'Major Power' League, securing 3rd spot after US and China.
1-United States – 80.5 (Super Power)
2-China – 73.7 (Super Power)
3-India – 40.0 (Major Power)
4-Japan – 38.8 (Middle Power)
5-Russia – 32.1 (Middle Power) pic.twitter.com/4mhOQFIpB2— Indian Infra Report (@Indianinfoguide) November 28, 2025
२. या सूचीत पाकिस्तान १४.५ गुणांसह १६ व्या स्थानावर आहे.
३. ‘एशिया पॉवर इंडेक्स-२०२५’मध्ये २७ देशांचे १३१ निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. यात संसाधने, अर्थव्यवस्था, सैनिकी शक्ती आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव यांचा समावेश आहे.
४. भारतातील परदेशी गुंतवणूक वाढल्यामुळे ‘इकॉनॉमिक रिलेशन इंडेक्स’मध्ये (आर्थिक संबंधांचा दर्ज्यामध्ये) भारत ९ व्या स्थानावर पोचला आहे.
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin