देहलीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’

देहली – गोव्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर देहलीत आतापासूनच धर्मजागृतीचा एक ज्वलंत उत्साह निर्माण झाला आहे. या भव्य आयोजनाची सिद्धता युद्धपातळीवर चालू झाली असून देहलीतील महत्त्वाचे चौक, प्रमुख रस्ते आणि गजबजलेल्या परिसरांमध्ये ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आकर्षक फलक झळकण्यास प्रारंभ झाला आहे.
या फलकांमुळे सर्वसामान्यांमध्ये या महोत्सवाविषयी उत्सुकता वाढली आहे.

देहली ही केवळ राजधानी नसून राष्ट्रीय निर्णयांची दिशा ठरवणारे केंद्र असल्यामुळे येथून सनातन संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश प्रभावीपणे जावा, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांसह हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी हे लोकांपर्यंत महोत्सवाचा विचार पोचवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांचे हे निःस्वार्थ प्रयत्न हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या ध्येयाप्रती असलेल्या त्यांच्या दृढनिष्ठेचे प्रतीक आहेत.

या वर्षी देहलीतील हा महोत्सव धर्माभिमान आणि राष्ट्रभक्ती यांचा भव्य समन्वय साधणारा ठरणार आहे. हा ‘शंखनाद’ संपूर्ण राष्ट्राला नवी दिशा देणारा ठरेल. देहलीतील हा साधना आणि संघटनशक्ती आगामी महोत्सवाला ऐतिहासिक उंचीवर नेईल.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !