आज १६ जुलै २०२६ या दिवशी ओडिशा राज्यातील श्री जगन्नाथपुरी येथे श्री जगन्नाथाच्या रथयात्रेचा उत्सव प्रारंभ होतो. त्या निमित्ताने ...

१. श्री जगन्नाथदेव आणि त्याच्याशी संबंधित देवतांच्या मूर्ती अन् त्यांचे मंदिर यांच्या स्थापनेची कथा
१अ. द्वापरयुगातील श्रीकृष्णाच्या हृदयातील तेज ओडिशा राज्यातील पुरुषोत्तम क्षेत्रातील घनदाट अरण्यातील एका गुहेत गुप्तपणे प्रगट होणे आणि याचा शोध भिल्लांचा प्रमुख ‘विश्ववसु’ याला लागून त्याने या दिव्य तेजाचे प्रतिदिन दर्शन घेऊन त्याची आराधना करणे : ‘द्वापरयुगात जेव्हा श्रीकृष्णाने अवतार समाप्त केला, तेव्हा त्याच्या स्थूलदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भगवान श्रीकृष्णाच्या पार्थिव देहाचे संपूर्ण दहन होऊनही त्याचे हृदय चिताभस्मात न जळता राहिले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा सखा आणि प्रिय भक्त अर्जुन याला एक दैवी संकेत मिळाला. त्यानुसार त्याने श्रीकृष्णाचे हृदय उचलून एका लाकडाच्या ओंडक्याच्या फटीत घातले आणि तो ओंडका अरबी समुद्रात सोडून दिला. त्यानंतर हा ओंडका वहात वहात ओडिशा राज्यातील श्री नीलांचल पर्वतावरील ‘श्री पुरुषोत्तम’ क्षेत्रात आला. त्यानंतर त्या हृदयातील दिव्य तेज तेथील घनदाट अरण्यातील रोहिणी सरोवराच्या जवळ एका गुहेत गुप्तपणे प्रगट झाले. कलियुगात या दिव्य तेजाचा शोध त्या वनात रहाणारा भिल्लांचा राजा ‘विश्ववसु’ याला लागला आणि तो प्रतिदिन जंगलातील त्या गुहेत जाऊन श्रीकृष्णस्वरूप असणार्या दिव्य तेजाचे दर्शन घेत होता अन् नित्य आराधना करत होता.

१ आ. पुरुषोत्तम क्षेत्रात प्रगट झालेल्या श्रीकृष्णाच्या तेजाची माहिती अवंती राज्याचा राजा आणि परम विष्णुभक्त इंद्रद्युम्न याला मिळणे अन् त्याने ईश्वरी संकेतानुसार पुरी नगरी वसवून त्या ठिकाणी श्री जगन्नाथाचे भव्य आणि सुंदर मंदिर स्थापन करणे : त्यानंतर याची माहिती जेव्हा अवंती नगरीचा राजा आणि परम विष्णुभक्त इंद्रद्युम्न राजाला मिळाली, तेव्हा तो त्याच्या दर्शनासाठी आला. त्या वेळी श्रीकृष्णाने एका ऋषींच्या रूपात त्या राजाला दर्शन देऊन त्याला पुरी नगर वसवून त्याच्या समुद्रकिनारी ‘श्री जगन्नाथदेवाचे’ भव्य मंदिर बांधण्यास सांगितले. राजाने तात्काळ मंदिर बांधले; परंतु त्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती स्थापना करणे शेष होते.
१ इ. ईश्वरी संकेतानुसार कोणत्याही शिल्पकाराला दैवी लाकडी ओंडक्यातून देवतांच्या मूर्ती बनवता न येणे आणि हे कार्य देवशिल्पी विश्वकर्म्याने पूर्ण करणे : ‘तेव्हा लाकडाचा एक दैवी ओंडका ओडिशाच्या समुद्रकिनारी आला; मात्र कोणत्याही शिल्पकाराला दैवी लाकडी ओंडक्यातून देवतांच्या मूर्ती बनवता आल्या नाहीत. तेव्हा या दिव्य लाकडापासून देवशिल्पी विश्वकर्मादेवाने श्री जगन्नाथदेव, श्री सुभद्रादेवी, श्री बलराम आणि सुदर्शनदेव यांच्या मूर्ती बनवल्या.’
(संदर्भ : विविध संकेतस्थळांवरील माहिती)
१ ई. देवतांच्या मूर्ती अपूर्ण असूनही त्यांतून देवतांचे संपूर्ण तत्त्व कार्यरत होण्याचा दैवी चमत्कार होणे : ‘ईश्वराच्या इच्छेने या चारही देवतांच्या मूर्ती अर्धवट स्वरूपात बनल्या आणि विश्वकर्मादेव अदृश्य झाला. तेव्हा राजाला मिळालेल्या दैवी संकेतावरून त्याने या चारही मूर्ती मंदिरात स्थापन केल्या. त्या वेळी अरण्यातील श्री पुरुषोत्तम क्षेत्रातील एका गुप्त गुहेतील श्रीकृष्णाचे दैवी तेज श्री जगन्नाथदेवाच्या मूर्तीत संक्रमित झाले आणि ओडिशा येथील पुरी क्षेत्रात श्रीकृष्णाचे तत्त्व पूर्णपणे प्रगट झाले. सामान्यतः एखाद्या देवाची मूर्ती जर अपूर्ण असेल, तर तिच्यामध्ये संबंधित देवाचे पूर्ण तत्त्व प्रगट होत नाही. याला अपवाद पुरी क्षेत्र येथील मंदिरातील श्री जगन्नाथदेव, श्री सुभद्रादेवी, श्री बलराम आणि सुदर्शनदेव यांच्या मूर्ती आहेत. या चारही अपूर्ण मूर्तींतून संबंधित देवतांचे संपूर्ण तेज प्रगट झाले आहे. भगवान श्रीकृष्ण हा पूर्णावतार असल्यामुळे त्याची मूर्ती अपूर्ण असूनही त्याचे संपूर्ण तत्त्व ‘श्री जगन्नाथदेवाच्या’ रूपात प्रगट झाले आहे, ही भगवंताची दैवी लीलाच आहे !
२. कलियुगातील श्रीकृष्णाचे तारक आणि सगुण रूप, म्हणजे ‘श्री जगन्नाथदेव’ !
‘श्री जगन्नाथदेव’ हा श्रीकृष्णाचा कलियुगातील मूर्ती स्वरूपातील अवतार आहे. द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाने तारक रूपासह अनेक वेळा असुरांचा वध करतांना मारक रूप धारण केले होते. कलियुगातील श्रीकृष्णाचे तारक आणि सगुण रूप, म्हणजे ‘श्री जगन्नाथदेव’ आहे.
३. ‘श्री जगन्नाथदेव’ अत्यंत भक्तवत्सल असणे
पुरी क्षेत्री श्री जगन्नाथदेवाच्या दर्शनाला येणार्या भाविकांना देवाचे दर्शन घेतल्यावर भगवंताची असीम प्रीती आणि कृपावत्सलता यांची अनुभूती येते. त्यामुळे ‘श्री जगन्नाथदेवाची’ कीर्ती सर्वत्र पसरली. त्याच्या या भक्तवत्सल आणि लीलाधारी रूपाचे दर्शन घेण्यासाठी त्याचे भक्त पुष्कळ दूर अंतरावरून येतात आणि त्याचे दिव्य दर्शन घेऊन कृतकृत्य होतात.
४. ‘श्री जगन्नाथदेव’ अत्यंत लीलाधारी असणे
‘श्री जगन्नाथदेव’ हा अत्यंत लीलाधारी आहे. त्याला मंदिराच्या गाभार्यात रहाणे आवडत नाही. त्याला भक्तांमध्ये रमायला आवडते. त्यामुळे ‘श्री जगन्नाथदेव’ त्याच्या भक्तांना विविध लीला दाखवून त्यांच्यावर भरभरून कृपा करत असतो. अशा या भक्तवत्सल आणि लीलाधारी ‘श्री जगन्नाथदेवाचे’ दर्शन घेण्यासाठी त्याचे लक्षावधी भक्त आसुसलेले असतात.
५. ‘श्री जगन्नाथाचा रथयात्रा उत्सव’ हा श्री जगन्नाथाची अलौकिक आणि दैवी लीला असणे
‘श्री जगन्नाथदेव’ भक्तांना भेटण्यासाठी इतका आतुर झालेला असतो की, तो भक्त मंदिरापर्यंत पोचण्याची वाट न पहाताच वर्षातून एकदा भक्तांना भेटण्यासाठी मंदिरातून बाहेर येतो आणि रथात बसून संपूर्ण नगरीत भ्रमण करतो. त्यामुळे सर्व भक्तगण हर्षित होऊन ‘श्री जगन्नाथाचा रथयात्रा उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्या वेळी अनेक जणांना अनेक प्रकारच्या अनुभूती येतात.
६. भक्तांसह अनेक देवदेवता आणि शिव अन् पार्वती यांनी विविध रूपांत येऊन श्री जगन्नाथाचा प्रसाद ग्रहण करणे
पुरी क्षेत्री श्री जगन्नाथदेवासह श्री महालक्ष्मी सूक्ष्मातून वास करते. ती प्रतिदिन श्री जगन्नाथासाठी एकावर एक ठेवलेल्या मातीच्या ७ पात्रांमध्ये नैवेद्य बनवते. तेव्हा सर्वांत वरच्या, म्हणजे सातव्या पात्रातील अन्न आधी शिजते आणि त्यानंतर एकेक करून खालील पात्रांतील अन्न क्रमानुसार शिजते. हा दैवी चमत्कारच आहे. त्यामुळे हा चमत्कार पहाण्यासाठी केवळ भक्तच नव्हे, तर देवर्षि नारद, स्वर्गलोकातील देवदेवता आणि ऋषिमुनी यांच्यासह शिव अन् पार्वतीही विविध रूपांत येतात अन् हा दैवी प्रसाद ग्रहण करतात.‘श्री जगन्नाथासाठी बनवलेला दिव्य नैवेद्य सर्व भक्तांना मिळावा’, यासाठी पार्वतीदेवीच्या ‘अन्नपूर्णा’ या रूपाने ‘विमलादेवी’ हे नाव धारण करून श्री जगन्नाथपुरीत वास केला आहे. त्यामुळे आधी विमलादेवीला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर श्री जगन्नाथ हा नैवेद्य ग्रहण करतो.
७. ‘श्री जगन्नाथपुरी’ हे भक्तांचे माहेर असल्यामुळे तेथे श्री जगन्नाथदेव आणि त्याचे भक्त यांच्या नित्य नवीन लीला सतत चालू असणे
‘श्री जगन्नाथदेव आणि त्याचे भक्त’ यांची सेवा करण्यासाठी परम रामभक्त हनुमान आणि बिभीषण हे सूक्ष्मातून श्री जगन्नाथपुरीत वास करतात. हे दोघे जण वेश पालटून श्री जगन्नाथदेवाच्या लीलेत सहभागी होऊन आनंद लुटतात. श्री जगन्नाथदेवही या दोन्ही भक्तांविना राहू शकत नाही. ज्यांना दिव्य दृष्टी प्राप्त आहे, त्यांना ‘श्री जगन्नाथपुरीत’ श्री जगन्नाथासह माता लक्ष्मी, बलराम, सुभद्रा आणि त्याचे भक्त असलेले सुदर्शनचक्र, बिभीषण आणि हनुमान यांचेही दर्शन होते अन् त्यांच्या दैवी लीला अनुभवता येतात. अशा प्रकारे ‘श्री जगन्नाथपुरी’ हे भक्तांचे माहेर असल्यामुळे तेथे श्री जगन्नाथदेव आणि त्याचे भक्त यांच्या नित्य नवीन लीला सतत चालू असतात, उदा. श्री जगन्नाथदेवाने भक्त माधवदास, कर्माबाई, बेला इत्यादी भक्तांसह केलेल्या लीला प्रसिद्ध आहेत.
८. श्री जगन्नाथपुरीत वास करणार्या देवता आणि भक्त यांची वैशिष्ट्ये !

९. जगन्नाथपुरीत वास करतो, हे श्री जगन्नाथ ।
जगन्नाथपुरीत वास करतो, हे श्री जगन्नाथ ।
भक्तांचा कैवारी असे, हे श्री लक्ष्मीनाथ ।। १ ।।
विश्वाचा प्रतिपाळ करतो, हे श्री विश्वनाथ ।
अनादी काळापासून कार्यरत आहे, हे श्री आदिनाथ ।। २ ।।
भक्तांवर कृपा करतो, हे श्री राधानाथ ।
प्रीतीमय स्वरूप तुझे, हे श्री प्राणनाथ ।। ३ ।।
भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देतो, हे श्री गोपीनाथ ।
हे करुणामय आणि भक्तवत्सल, हे श्री दीनानाथ ।। ४ ।।
भक्तांच्या भक्तीत रंगतो, हे श्री रंगनाथ ।
भक्तांवर प्रीती करतो, हे श्री प्रेमनाथ ।। ५ ।।
सर्व भक्तांच्या हृदयात वास करतो, हे श्री हृदयनाथ ।
सर्व भक्तांवर कृपेचा वर्षाव करतो, हे श्री कमलानाथ ।। ६ ।।
भक्तांचा कैवारी असे, हे श्री रमानाथ ।
भक्तवत्सल असे, हे श्री जानकीनाथ ।। ७ ।।
भक्तांचे दैन्य दूर करतो, हे श्रीनाथ ।
साधकांचा उद्धार करतो, हे श्री गुरुनाथ ।। ८ ।।
११. सारांश
‘खर्या भक्तांना कोणत्याही युगात होऊन गेलेल्या अवताराचे तत्त्व कोणत्याही रूपात येऊन दिव्य दर्शन देते’, हे सूत्र या लेखातून शिकायला मिळाले.
१२. श्री गुरुचरणी कृतज्ञता आणि प्रार्थना
‘श्री गुरुकृपेनेच श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उमजली’, त्याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘आम्हा साधकांमध्येही श्री जगन्नाथदेवाच्या परम भक्तांप्रमाणे श्री गुरूंप्रती ‘गुरुभक्ती’ जागृत होऊन आम्हाला नित्य गुरुप्रसाद मिळावा’, अशी मी श्री गुरूंच्या पावन चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखनाचा दिनांक : ६.७.२०२६, वेळ : दुपारी १२.३० ते १.०५ अन् एकूण कालावधी ३५ मिनिटे)
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !