रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे आश्वासन

मॉस्को (रशिया) – रशिया कधीही युरोपवर आक्रमण करणार नाही. जर युरोपला हवे असेल, तर लेखी आश्वासन देण्यास सिद्ध आहे, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यापूर्वी जर्मनीचे परराष्ट्रमंत्री योहान वेडफुल यांनी आरोप केला होता की, रशिया पुढील ४ वर्षांत कोणत्याही ‘नाटो’ (‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) देशावर आक्रमण करू शकतो.
पुतिन म्हणाले की, युरोपीय नेते केवळ शस्त्रे बनवणार्या आस्थापनांचे तळवे चाटत आहेत. ते त्यांच्या जनतेमध्ये एक खोटा भ्रम निर्माण करू इच्छितात.
युक्रेनच्या सैनिकांना माघार घ्यावी लागेल !
पुतिन यांनी सांगितले की, रशियाच्या नियंत्रणात असलेल्या भागातून युक्रेनच्या सैन्याला माघार घ्यावी लागेल. रशिया चर्चेसाठी सिद्ध आहे; परंतु आवश्यकता भासल्यास लढाई चालू ठेवण्याचा पर्यायही मोकळा आहे. जर युक्रेनचे सैनिक मागे हटले नाहीत, तर आम्ही हे उद्दिष्ट सैनिकी कारवाईने पूर्ण करू.
सध्या रशियाचा युक्रेनच्या १९ टक्क्यांपेक्षा अधिक भागावर नियंत्रण आहे. यापैकी बहुतेक भाग डोनबास आणि लुहान्स्क प्रांतांचा आहे.
पुतिन ४ डिसेंबरला भारताच्या दौर्यावर येणार![]() पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या २ दिवसांच्या अधिकृत दौर्यावर येणार आहेत. ते ४ डिसेंबर या दिवशी येथे येणार आहेत, तर पुढील दिवशी म्हणजे ५ डिसेंबरला परत जाणार आहेत. हा दौरा भारत-रशिया यांच्या २३ व्या वार्षिक शिखर परिषद अंतर्गत आयोजित केला जात आहे. या भेटीमध्ये पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा करतील. |

‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत