अराजकतावादी चेहरा ओळखा !

मार्क्सवादी साम्यवाद्यांनी सांस्कृतिक मार्क्सवादाची नवी व्यूहरचना करून तिच्या आधारे सामाजिक न्याय अशा आकर्षक मुखवट्यांमागे अराजक, हिंसा आणि विध्वंस घडवण्याचे स्वतःचे कार्य चालू ठेवले आहे. मुखवटे आकर्षक असले, तरी चेहरा भेसूर असतो, याची प्रचीती देहलीत २४ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या निदर्शनांच्या वेळी आली.

श्री. अभिजित जोग

देहलीतील प्रदूषणाचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने असल्याचे साळसूद कारण दिलेले असले, तरी खरा उद्देश ‘नक्षलवाद्यांविरुद्ध चालू असलेल्या सुरक्षादलांच्या धडक कारवाईला विरोध करणे’, हाच होता. या निदर्शनांच्या वेळी कुख्यात नक्षलवादी हिडमा याच्या समर्थनार्थ घोषणा देत फलक फडकवले. या निदर्शकांच्या चेहर्‍यावरून त्यांच्या मनातील टोकाचा विद्वेष स्पष्ट दिसून येतो. पोलिसांवर तिखटाचे, मिरपुडीचे स्प्रे मारले गेले, ते या विद्वेषातूनच ! यातून मिळणारा धडा एकच. आकर्षक मुखवट्यांना भुलू नका. त्यामागचा अराजकतावादी आणि विध्वंसक चेहरा ओळखा !

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२५.११.२०२५)