B. T. Lalitha Naik : (म्हणे) ‘राम, लक्ष्मण आदर्श नाहीत, तर क्रूर आहेत !’

कर्नाटकातील साहित्यिक बी.टी. ललिता नायक

बी.टी. ललिता नायक

दावणगेरे (कर्नाटक) – रामायणातील श्रीराम, लक्ष्मण आणि रावण हे आदर्श व्यक्ती नसून क्रूर आहेत, असे विधान साहित्यिक बी.टी. ललिता नायक यांनी केले आहे. शहरातील ए.व्ही.के. महिला महाविद्यालयाच्या सभागृहात २३ नोव्हेंबरला झालेल्या एका चर्चासत्राच्या समारोपात त्या बोलत होत्या.

ललिता नायक यांनी केलेली हिंदुद्रोही विधाने !

सर्वांना भक्तीच्या नावावर आदर्श व्यक्ती म्हणून चित्रित केले गेले !

ज्याची सगळे पूजा करतात, त्या श्रीरामाने आपल्या पत्नीवर संशय घेतला आणि तिला वनात सोडून येण्यास भाऊ लक्ष्मणाला सांगितले. क्रूर प्राण्यांचे ती खाद्य व्हावी, अशीच रामाची इच्छा होती; पण लक्ष्मणाने तरी ‘हे चूक आहे’, असे म्हणायला हवे होते; मात्र त्याने तसे केले नाही. लक्ष्मणाला नाक कापण्याची सवय होती; म्हणूनच त्याने शूर्पणखेचे नाक कापले. महान पराक्रमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या रावणाने चोरी करून दुसर्‍याची पत्नी पळवून नेली; पण या सर्वांना भक्तीच्या नावावर आदर्श व्यक्ती म्हणून चित्रित केले गेले आहे. (तोंड आहे म्हणून काहीही बरळणार्‍या ललिता नायक ! अन्य धर्मियांच्या संदर्भात अशा प्रकारची विधाने केली असती, तर एव्हाना त्यांना ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेदाच्या) धमक्या मिळाल्या असत्या ! – संपादक)

गांधी यांच्या हातात केवळ चरखा !

शांतीचे प्रतीक असलेल्या बुद्धाच्या हातात कोणतीही तलवार, ढाल किंवा खड्ग नाही. म. गांधी यांच्या हातात केवळ चरखा आहे; पण अलीकडे श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण दिले गेले आहे. (‘अलीकडे’ असा शब्द वापरणार्‍या नायक यांना इतिहास ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ? हिंदूंचा जाणीवपूर्वक बुद्धीभेद करण्याचाच हा प्रयत्न आहे ! – संपादक)

मंदिरे लोकांना अंधश्रद्धेकडे ढकलत आहेत !

मंदिरे लोकांना अंधश्रद्धेकडे ढकलत आहेत. अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे. (मशिदी, मदरसे येथे आतंकवादी सापडतात याविषयी नायक बोलू शकतील का ? तेथे कोणती ‘श्रद्धा’ शिकवली जाते, हे त्या सांगू शकतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारची विधाने करणे आता ‘फॅशन’ झाली आहे. अशांना आता हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून फाशीचीच शिक्षा करण्याची शिक्षा असणारा कायदा करणे अत्यंत आवश्यक झाले आहे !
  • ‘ललिता नायक यांनी असे विधान मुसलमानांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात करून दाखवावे’, असे खुले आव्हान कुणा हिंदु धर्मप्रेमीने त्यांना दिले, तर ते स्वीकारण्याचे धाडस त्या दाखवतील ?