
नवी देहली, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – विविध क्षेत्रांत राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांनी समस्त धर्मप्रेमी हिंदूंना देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या कालावधीत होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे आवाहन व्हिडिओद्वारे केले आहे.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ सनातन संस्कृतीच्या तेजाचा अविस्मरणीय उत्सव ठरेल ! – कर्नल मोहन काकतीकर (निवृत्त), मुख्य कार्यवाह, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती, नवी देहली
देहली येथे होणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ भारताचा वैभवशाली इतिहास आणि सनातन संस्कृती यांच्या तेजाचा अविस्मरणीय उत्सव ठरणार आहे. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील अद्वितीय शस्त्रांचे प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन भारतीय शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमान यांचे प्रतीक ठरेल. सनातन धर्माच्या अखंड तेजाची जपणूक करण्यासाठी, तसेच तरुण पिढीत राष्ट्राभिमान आणि संस्कार जागवण्यासाठी प्रेरणादायी अन् विचारप्रवर्तक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रेमींनी या ऐतिहासिक महोत्सवात सहभागी व्हावे.
सांस्कृतिक चेतनेचे पुनर्जागरण घडवून आणणारे भव्य आंदोलन ! – उदय साहाय, सेवानिवृत्त भारतीय पोलीस अधिकारी
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ एक उत्सव नाही, तर संपूर्ण देशात आपल्या सांस्कृतिक चेतनेचे पुनर्जागरण घडवून आणणारे एक भव्य आंदोलन आहे. या महोत्सवाच्या आयोजनाशी माझा निकटचा संबंध असल्याचा मला अपार अभिमान वाटतो. या महोत्सवात राष्ट्र आणि अंतर्गत सुरक्षा यांवर आधारित सांस्कृतिक दृष्टीकोनातून चर्चासत्रे होणार आहेत. बुद्धीजीवींच्या विचारविनिमयासाठी आणि राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरेल. सर्वांनी या भव्य उपक्रमात सहभागी होऊन योगदान द्यावे, असे मी आवाहन करतो.
राजधानीतून संपूर्ण विश्वाला सनातन राष्ट्राचा दिव्य संदेश जाईल ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन वृत्तवाहिनी
हा महोत्सव देशाच्या राजधानीतून संपूर्ण विश्वाला सनातन राष्ट्राचा दिव्य संदेश देईल. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भवानी तलवार, तसेच अनेक ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रेमी यांनी स्वत:च्या कुटुंबासह या ऐतिहासिक महोत्सवाला उपस्थित रहावे.
| ‘गीता प्रेस’चे मुख्य विश्वस्त श्रीकृष्ण खेमका यांना निमंत्रण !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धार्मिक ग्रंथ प्रकाशित करणार्या भारतातील सुप्रसिद्ध अशा ‘गीता प्रेस’चे मुख्य विश्वस्त तथा मासिक ‘कल्याण पत्रिका’चे सहसंपादक श्री. श्रीकृष्ण कुमार खेमका यांना देहलीतील ‘भारत मंडपम्’मध्ये १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या दिवशी होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी हे निमंत्रण दिले. या वेळी समितीचे श्री. राजन केशरी उपस्थित होते. |
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !