नुकतेच ‘नेटफ्लिक्स’वर ‘बारामुल्ला’ हा हिंदी चित्रपट पाहिला ! नाव शोधत गेलो, तर समजले, ‘बारामुला’ म्हणजे ‘वराहमूल’. श्रीविष्णूंच्या वराह अवताराची स्मृती, काश्मीर खोर्यातील एक प्राचीन गाव. चित्रपट पाहून विचार आला की, आपण चुकलो. राज्यघटनेवर चालणारी या देशाची न्याय आणि राजकीय व्यवस्था अन् समाज या सर्वच पातळ्यांवर स्वतःच्याच देशात निर्वासित झालेल्या काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यात आपण समाज म्हणून अपयशी ठरलो ! हेच सत्य हा चित्रपट उगाळून सांगत नाही, तर तो शांतपणे आपणा सर्वांसमोर आरसा धरतो आणि आपल्याला खडबडून जागे करतो. इथले भय हे अंधार्या खोल्यांमध्ये नाही, ते आपल्या निष्काळजीपणात आहे ! ‘वोक’ ठरायच्या नादात जी वैचारिक दिवाळखोरी आपण अंगीकारली, तीही हा चित्रपट उघड करतो. (‘वोक’ म्हणजे सामाजिकदृष्ट्या सध्याची व्यवस्था आणि सामाजिक संस्कृती यांना विरोध करणे.)

१. काश्मिरी हिंदूंचे सत्य जगासमोर आणणारा चित्रपट
काश्मिरी पंडितांच्या (हिंदूंच्या) पलायनाचे मुख्य कारण, म्हणजे धार्मिक कट्टरता ! या कट्टरतेला विरोध करणार्या पंडितांच्या घरांच्या भिंतींवर एकेकाळी कोरलेले आणि आपल्या सामूहिक स्मृतीतून हेतूपूर्वक पुसलेले ‘काफिर’ पडद्यावर पुन्हा निडरपणे दिसते. धर्मांतर, मृत्यू किंवा पलायन हे केवळ तीनच पर्याय. मृत्यू अथवा नेसत्या वस्त्रानिशी जीव वाचवून निघतांना मागे उरणारी घरे तदनंतर बळकावून वापरली जातात; मात्र त्या घरातील अन्यायाच्या, हिंसाचाराच्या आणि विश्वासघाताच्या काळ्याकुट्ट आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. जिहादी विचारांना जेव्हा भाषास्वातंत्र्य, हिंसेला परिस्थितीचे कवच दिले जाते, तेव्हा आतंकवादी हा शाळेच्या मुख्याध्यापकाचा मुलगा होतो आणि दगडफेक चळवळीचे ‘टूलकिट’ बनवून जगभर विकले जाते. शाळांमध्ये खोटा इतिहास शिकवला जातो, न्यायव्यवस्था काही प्रकरणांकडे समदृष्टीने पहात नाही आणि कट्टरता ‘वोक विचारसरणी’च्या सावलीत फोफावते. त्याच वेळी ‘काश्मिरी पंडितांचा वंशविच्छेद जणू घडलाच नाही’, असे दाखवले जाते; त्यांच्या असामान्य छळाला ‘सर्वसाधारण’ ठरवले जाते. त्यांच्यावर चालेल्या अन्यायावर साधा खटलाही ऐकला जात नाही – केवढा हा दैवदुर्विलास ! मात्र चित्रपटाचे प्रभावी माध्यम वापरून चित्रपटाच्या कथाकाराने रोमांचकारी कथेने, दिग्दर्शकाने अफलातून ‘सिनेमॅटोग्राफी’च्या (चित्रपटशास्त्राच्या) साहाय्याने आणि सर्व कलाकारांनी त्यांच्या विलक्षण अभिनयाच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांचे सत्य जगासमोर आणले आहे !
२. … पुन्हा असा वंशसंहार टाळायला हवा !
आज आपण कट्टरता आणि आतंकवादाच्या ‘टाइम बाँब’वर बसलेलो आहोत. इतिहासापासून आपण शिकलो नाही, तर जे १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये झाले, ते येणार्या काळात इतरत्रही होऊ शकते, या वास्तवाची जाणीवही हा चित्रपट करून देतो. काश्मीरमध्ये जे झाले, ते काश्मीर खोर्यात अडकून पडलेले नाही ! सत्याला ‘स्टँडबाय’वर (राखीव) ठेवणार्या जगातील कोणत्याही कानाकोपर्यात हे ते पुन्हा केव्हाही होऊ शकते ! चित्रपट संपतो; पण त्याची कथा मात्र पहाणार्याच्या मनात कायमचे घर करून जाते. माझ्यादृष्टीने ‘बारामुल्ला’ आवर्जून बघणे आवश्यक आहे, ते जुने घाव कुरवाळायला नाही, तर नवे टाळायला. काश्मिरी पंडितांसह जे झाले, त्याकडे डोळसपणे बघूया. त्यांना साथ देऊया आणि सतर्क होऊया !
– अधिवक्ता आशिष विलास सोनवणे, पुणे
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani