|

मुंबई, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त व्हावी, यासाठी वरळी येथील गांधी (जांभोरी) मैदानावर चालू असलेल्या श्री नारायण महायज्ञाच्या ठिकाणी काही समाजकंटकांनी दंगा केला. यज्ञाच्या निमित्ताने पटांगणाबाहेर लावलेल्या विविध फलकांमध्ये पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी या यज्ञासाठी दिलेल्या शुभेच्छेचाही फलक होता. त्यावर त्यांचे छायाचित्र होते. समाजकंटकांनी हा फलक फाडून टाकला. १५ नोव्हेंबरला सायंकाळी ७.३० ते रात्री ८ या वेळेत ‘जय भीम’, ‘मनोहर भिडे मुर्दाबाद’ अशा घोषणा देत मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ १५-२० समाजकंटकांनी हा प्रकार केला. या वेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली; मात्र फलक फाडणार्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त व्हावी, यासाठी ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’च्या वतीने १५ आणि १६ नोव्हेंबर या दिवशी हा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी गांधी मैदानाच्या बाहेर फलक लावले होते. समाजकंटकांनी मैदानाबाहेर दंगा केल्याचे समजताच यज्ञस्थळी उपस्थित हिंदूही मोठ्या संख्येने ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, अशा घोषणा देत मैदानाच्या प्रवेशद्वारावर आले. दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. साधारण २०-२५ मिनिटांनी परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकारानंतर रात्री ९.३० वाजता गांधी मैदानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पहारा होता. या घटनेविषयी ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’चे राष्ट्रीय महामंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे संयोजक श्री. पराग फडणीस यांच्याशी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबरच्या सायंकाळी माध्यमांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात येईल.’’
🚨 At the Shri Krishna Janmabhoomi liberation Yagya, casteist anti-social elements barged in, vandalised hoardings of Pujya Bhide Guruji, and incited chaos with ‘Jai Bhim’ slogans.
😡 Hoardings are torn in full public view, yet the Mumbai Police take zero action.
❓ Why are… https://t.co/cztGQAUmwe pic.twitter.com/GjMpGycr0I
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 17, 2025
समाजकंटकांचा दंगा अनाठायी !समाजकंटकांनी फाडलेल्या फलकावर पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या चित्रासह ‘शुद्ध हेतूने आयोजित श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या धर्मकार्यास माझ्या अखंड शुभेच्छा ! छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करूया’, असा शुभेच्छासंदेश होता. या संदेशामध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हते. केवळ पू. भिडेगुरुजी यांचे चित्र आणि संदेश आहे; म्हणून समाजकंटकांनी हा दंगा केल्याची चर्चा आहे. |
संपादकीय भूमिका
|
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक