
जळगाव – सनातन राष्ट्राचे पुनर्वैभव प्राप्त करणे, त्याचा सांस्कृतिक वारसा जपणे आणि टिकवणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षा, या महत्त्वाच्या विषयांवर दिशादर्शन करण्यासाठी देहली येथील ‘भारत मंडपम्’ येथे सनातन संस्थेच्या वतीने १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संसदेत जळगावचे प्रतिनिधित्व करणार्या मान्यवरांना भेटून या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.
१. देशाच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांना भेटून देहली महोत्सवाचे निमंत्रण सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी दिले. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२६’ भेट देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर हेही उपस्थित होते.
२. जळगाव येथील भाजपच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ यांना देहली महोत्सवाचे निमंत्रण सनातन संस्थेचे सर्वश्री दत्तात्रेय वाघुळदे आणि वसंत पाटील यांनी दिले.
३. राज्यसभेचे खासदार आणि प्रथितयश अधिवक्ता उज्ज्वल निकम यांना श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. दिलीप पोळ यांनी निमंत्रण दिले.


Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !