|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथे ११ नोव्हेंबरला झालेल्या बाँबस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २७ जण घायाळ झाले होते. सध्या श्रीलंकेचा क्रिकेट संघ पाकच्या दौर्यावर आहे. तो इस्लामाबाद येथेच रहात आहे. या स्फोटानंतर या संघाने मायदेशी परतण्याची विनंती त्यांच्या क्रिकेट मंडळाला केली होती; मात्र मंडळाने ही विनंती फेटाळून सामने खेळण्याची सक्ती केली आहे. ‘मायदेशी परतण्याचा प्रयत्न केला, तर चौकशी केली जाईल’, अशी धमकीही देण्यात आली आहे. ‘पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सुरक्षेची हमी दिली आहे, त्यामुळे खेळाडूंनी दौरा पूर्ण करावा’, असे श्रीलंकेच्या मंडळाने म्हटले आहे.
🚨 Sri Lankan Cricketers Fear For Safety In Pakistan 🇱🇰🏏
After the #IslamabadBlast, Sri Lankan players who are on tour are considering returning home.
Yet, the Sri Lanka Cricket Board has insisted they continue playing.
🔹 Reminder: In 2009, terrorists attacked the Sri Lankan… https://t.co/8wZ5lkaQfU pic.twitter.com/YxR0KWKsvH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 13, 2025
१. श्रीलंकेचा संघ या दौर्यात एक दिवसाचे (वन डे) ३ सामने खेळणार होता. त्यापैकी एक सामना झाला आहे, तर २ बाकी आहेत. यानंतर पाकिस्तान, झिम्बॉब्वे यांच्यासह तिरंगी मालिका होणार आहे.
२. वर्ष २००९ मध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौर्यावर असतांना त्यांच्यावर आतंकवादी आक्रमण झाले होते. सुदैवाने या आक्रमणात जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेचा गंभीर परिणाम होऊन अनेक क्रिकेट संघांनी पाकिस्तानात येणे थांबवल्याने पाकिस्तान संघाचे सामने संयुक्त अरब अमिरात येथे होऊ लागले.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan