११ नोव्हेंबर २०२५ या दिवशी काही युवा साधकांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज पुढील भाग पाहू.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/975631.html

३. कु. ओम् सूर्यवंशी
३ अ. ‘ओम् सतत हसतमुख असतो.
३ आ. शिकण्याची वृत्ती : त्याने लहान वयातच ‘वीज जोडणी, ध्वनीक्षेपक व्यवस्था, शिबिराची सिद्धता, सभागृह सजावट’ इत्यादी सेवा शिकून घेतल्या आहेत.

३ इ. जवळीक साधणे : त्याच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील युवा सत्संग सेवेचे दायित्व आहे. तो ‘तरुणांना संपर्क करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांना साधनेत साहाय्य करणे’ इत्यादी प्रयत्न करतो. तो उत्साहाने आणि प्रेमाने युवा धर्मप्रेमींशी जुळवून घेतो.
३ ई. सेवेची तळमळ : त्याला युवा सत्संग सेवेसंदर्भात नवीन कल्पनाही सुचतात. ‘या सेवेची घडी बसण्यासाठी कसे प्रयत्न करू ? तरुणांना सत्संगाला कसे जोडू शकतो ?’, अशी त्याची सतत तळमळ असते.’

४. श्री. प्रवीण नराल
४ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दर्शनानंतर साधना करण्याचा निश्चय करणे : ‘पूर्वी प्रवीणला अयोग्य सवयी होत्या. त्याला घरातून साधनेसाठी तीव्र विरोध होता. तो एका सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवस गेला होता. तेथे त्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर त्याने ‘आता साधनाच करायची’, असे ठरवले.
४ आ. नातेवाइकांच्या विरोधाला न जुमानता साधनाच करण्याचा निर्णय वडिलांना सांगणे आणि वडिलांचा साधनेसाठी असलेला विरोध मावळणे : तो गुरुपौर्णिमेच्या प्रचाराची सेवा करू लागला. त्या वेळी त्याच्या नातेवाइकांनी त्याला पाहिले आणि त्याच्या आईला बोलावून घेतले. आईने आग्रहाने त्याला घरी नेले. सर्व नातेवाईक एकत्र जमले. तेव्हा प्रवीण त्यांना म्हणाला, ‘‘तुम्ही मला थांबवू नका. मला साधनेसाठी जाऊ द्या. तुम्हाला आवश्यकता असतांना मी घरी येईन; पण मला आता गुरुसेवेसाठी जाऊ द्या.’’ नंतर त्याच्या वडिलांचा विरोध मावळला.
४ इ. शिकण्याची वृत्ती
१. प्रवीणकडे सोलापूर जिल्ह्यातील धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे दायित्व आहे. ही सेवा शिकण्यासाठी तो तळमळीने प्रयत्न करतो.
२. त्याची मातृभाषा तेलुगु आहे. त्याचे बोलणे, त्याच्या खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत; मात्र त्याने सेवाकेंद्रात येऊन स्वतःत पालट केले. त्याने घरात कधी काम न केल्याने आरंभी त्याला सेवाकेंद्रातील सेवा करणे जमत नव्हते आणि आवडतही नव्हते; मात्र नंतर सेवाकेंद्रातील भांडी घासणे, केर काढणे, लादी पुसणे इत्यादी सेवाही त्याने शिकून घेतल्या. आता तो या सर्व सेवा करतो.
३. त्याची मातृभाषा तेलुगु असल्याने त्याला मराठी भाषेत धर्मसत्संग घेणे, विषय मांडणे इत्यादी सेवा कठीण वाटत असत. नंतर त्याने या सेवा शिकण्यासाठी प्रयत्न केले.
४ ई. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : तो सकाळी लवकर उठून नामजपादी उपाय पूर्ण करतो. तो स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, स्वभावदोषांची सारणी लिहिणे इत्यादी करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतो. तो प्रतिदिन व्यष्टी साधनेचे ध्येय घेऊन प्रयत्न करतो.
४ उ. समष्टी सेवेची तळमळ : तो ‘प्रतिदिन किती संपर्क करणार ?’, याविषयी ठरवतो आणि त्यानुसार सेवा करतो. त्याने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या कालावधीत १०० प्रचार बैठका घेणार’, असे ध्येय घेतले होते. ते पूर्ण करण्यासाठी त्याने तळमळीने प्रयत्न केले आणि त्याने १०० बैठका ठरवल्या. त्याने ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार करण्यासाठीही ध्येय घेतले आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले.
४ ऊ. धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्याशी जवळीक साधणे : त्याने जिज्ञासूंना चांगले जोडून ठेवले आहे. तो त्यांना साधनेसाठी प्रेमाने साहाय्य करतो. धर्मप्रेमी आणि जिज्ञासू त्याला त्यांच्या अडचणी मोकळेपणाने सांगतात. त्यांना प्रवीणचा आधार वाटतो. तो प्रत्येक वेळी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांना गुरुदेवांविषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी) सांगतो. तो सर्वांना ‘तुम्ही गुरुदेवांना प्रार्थना करा, नामजप आणि साधना करा’, असे पुष्कळ तळमळीने सांगतो. त्यामुळे जिज्ञासूही व्यष्टी साधनेचे प्रयत्न करू लागले आहेत. ते प्रवीणला व्यष्टी साधनेचा आढावाही देतात.
४ ए. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : त्याला एखादी सेवा करायला जमली नाही, काही अडचण आली, तरीही तो सतत सकारात्मक असतो. ‘गुरुदेव आहेत ना ! मग सेवा होणारच !’, असा त्याचा भाव असतो. त्यामुळे त्याचा उत्साह न्यून होत नाही. त्याच्यामधील गुरुदेवांप्रती असलेल्या भावामुळे त्याने जोडलेल्या जिज्ञासूंमध्येही गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव जाणवतो. त्यांनाही ‘गुरुदेव घरात आहेत. ते सतत समवेत आहेत’, अशा अनुभूती येतात.’

५. श्री. संकेत पिसाळ
५ अ. सेवाकेंद्रात रहाण्याची ओढ : ‘संकेतला काही कामानिमित्त घरी जावे लागले, तरीही तो सांगितलेल्या दिवसांपेक्षा लवकरच सेवाकेंद्रात परत येतो. ‘‘गुरुदेव मला तिथे अडकू देत नाहीत. गुरुदेवांच्या कृपेने अल्पावधीतच माझे काम पूर्ण होते. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला लवकर सेवाकेंद्रात येता येते’’, असे तो सांगतो. त्याला घरी रहावेसे वाटत नाही.
५ आ. धर्मप्रेमींशी जवळीक साधणे : तो धर्मशिक्षणवर्ग घेतो. वर्गातील सर्व धर्मप्रेमींना जोडून ठेवण्यासाठी तो चांगले प्रयत्न करतो. तो धर्मप्रेमींच्या अडचणी समजून घेतो. तो त्यांना आपलेसे करतो. त्यामुळे धर्मप्रेमीही त्याच्याशी मोकळेपणे बोलतात.
५ इ. प्रेमभाव : संकेत संपर्काला गेल्यावर वयस्कर आणि लहान मुले यांच्याशी तो आपलेपणाने, त्यांच्यातील एक होऊन बोलतो. त्यामुळे सर्व जण त्याच्याशी आपलेपणाने बोलतात.
५ ई. नामजपादी उपायांचे गांभीर्य
१. ‘साधना आणि सेवा यांत कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत’, यासाठी तो नामजापदी उपाय मनापासून करतो.’
– (पू.) दीपाली मतकर, सोलापूर (१२.७.२०२५)
(समाप्त)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !