
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रश्न
‘अध्यात्म हे अनंताचे ज्ञान आहे, तरी मी प्रतिदिन सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना नवीन प्रश्न विचारत असतो. त्याचे कारण आणि लाभ काय ? असे विचारण्यापेक्षा मी माझ्या साधनेकडे सर्व लक्ष का देत नाही ?’ (२९.५.२०२६)
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ज्ञानकार्याचे स्वरूप
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांकडून समष्टीसाठी उपयोगी असलेल्या अध्यात्माचे ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अध्यात्मावर आधारित विविध प्रश्न सुचतात. या प्रश्नांची उत्तरे कुठल्याही धर्मग्रंथात नाहीत. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. पती हा पत्नीपेक्षा वयाने मोठा असतो. पत्नी पतीची आयुष्यभर सेवा करते. आयुष्याच्या शेवटी बहुतेक वेळा पतीचे आधी निधन होते. पुढे पत्नीची सेवा करण्यास पती नसतो. मग त्या दोघांतील देवाण-घेवाण कसे पूर्ण होतात ?
२. पक्षी अन्न शोधण्यासाठी घरट्यापासून दूर अंतरावर जातात. त्यांना त्यांचे घरटे पुन्हा कसे सापडते ?
३. साधकाचे तनाच्या त्यागाने तनाचे, मनाच्या त्यागाने मनाचे आणि धनाच्या त्यागाने धनाचे प्रारब्ध फिटते का ?
४. मृत्यूनंतर जिवाला सूक्ष्म लोकांत तिचे मृत नातेवाईक भेटतात का ? ते एकमेकांना ओळखतात का ? इत्यादी.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्मातून उत्तरे मिळवण्यासाठी असे नाविन्यपूर्ण प्रश्न सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ते साधक (सुश्री मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप) यांना विचारतात. हे साधक या प्रश्नांची सूक्ष्मातून उत्तरे मिळवतात आणि त्यानंतर ही उत्तरे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर पडताळतात. सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाच्या उत्तरांत काही ज्ञान अपूर्ण असल्यास ते साधकाला त्याविषयीचा उपप्रश्न विचारतात. तेव्हा तो उपप्रश्नाविषयी सूक्ष्मातून ज्ञान मिळवतो. शेवटी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर ती धारिका अंतिम पडताळतात. पुढे हे सूक्ष्मातील ज्ञान समष्टीसाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातन संस्थेचे ग्रंथ यांमध्ये प्रकाशित केले जाते.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी समष्टीसाठी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांकडून अध्यात्माचे ज्ञान मिळवण्याची कारणे
३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना समष्टी कार्य करण्यासाठी स्थूल देहाच्या मर्यादा असणे : देश-विदेशांत जिज्ञासू आणि साधक असतात. साधना करतांना त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास त्यांची ‘साधना चांगली होणे आणि साधनेचे गांभीर्य निर्माण होणे’, हे साध्य होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अशा साधकांपर्यंत पोचून त्यांचे शंकानिरसन करण्यास स्थूल देहाच्या मर्यादा आहेत. वरील प्रकारच्या प्रश्नोत्तरांद्वारे ते ही मर्यादा दूर करतात.
३ आ. जिज्ञासू आणि साधक यांच्या मनातील प्रश्न सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अंतर्ज्ञानाने समजणे : ज्याप्रमाणे शरिरात कुठेही उष्णता, थंडावा, वेदना आणि स्पर्श जाणवल्यास त्या संवेदना थेट मेंदूपर्यंत पोचतात, त्याप्रमाणे देश-विदेशांतील जिज्ञासू, तसेच साधक यांच्या साधनेतील अडचणी अन् मनातील प्रश्न सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अंतर्ज्ञानाने समजतात; कारण ते अवतारस्वरूप आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अशा प्रश्नांचे स्फुरण होते आणि ते या प्रश्नांची लगेच नोंद घेतात. सूक्ष्मातून उत्तरे मिळवण्यासाठी ते असे प्रश्न सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारतात.
३ इ. विविध प्रश्न विचारतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर चालू आणि पुढील पिढ्यांचाही विचार करत असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अध्यात्मावरील विविध प्रश्न विचारतांना चालू पिढीचा विचार करतात, तसेच त्यांना ‘भविष्यात जिज्ञासू आणि साधक यांच्या मनात कोणते प्रश्न येऊ शकतात ?’, हेही अंतर्ज्ञानाने समजते. यानुसार ते सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना तेही प्रश्न विचारतात.
४. सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणार्या ज्ञानाचा जिज्ञासू आणि साधक यांना होणारा लाभ
४ अ. साधना आणि अध्यात्म यांविषयी सुस्पष्टता येणे : साधना आणि अध्यात्म यांमध्ये अनेक सूक्ष्म पैलू आहेत. साधना करतांना साधनेतील सूक्ष्म पैलूंविषयी जिज्ञासू आणि साधक यांच्या मनात काही प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. ‘प्रत्येकाची प्रकृती आणि आध्यात्मिक पातळी’ ही भिन्न असल्याने साधकांचे प्रश्नही भिन्न असतात. अशा प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास साधकाला साधना आणि अध्यात्म यांविषयी सुस्पष्टता येते. परिणामी त्याची साधना चांगल्या प्रकारे होते.
४ आ. साधनेचे गांभीर्य निर्माण होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर ‘पती-पत्नीतील देवाण-घेवाण, प्रारब्ध, कर्मफलन्याय, वाईट शक्तींचा त्रास, साधना, सनातन धर्म’ इत्यादी विविध विषयांवर प्रश्न विचारतात. सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून यांची उत्तरे मिळतात. अशा उत्तरांमध्ये त्या त्या विषयाची व्याप्ती पुष्कळ आणि सूक्ष्म असते. यातून साधना आणि गुरु यांची अपरिहार्यता ठळकपणे व्यक्त होत असते. त्यामुळे जिज्ञासू आणि साधक यांच्यातील साधनेचे गांभीर्य वाढण्यास साहाय्य होते.
४ इ. गुरु आणि भगवंत यांच्याविषयीचा विश्वास, श्रद्धा, तसेच भाव बळकट होणे : सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणार्या सूक्ष्मातील ज्ञानात अनेकदा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि भगवंत सूक्ष्म रूपाने कसे कार्य करतात ? ते साधकांना कसे साहाय्य करतात ?’, यांविषयीचे विश्लेषण असते. त्यामुळे साधकांचा गुरु आणि भगवंत यांच्याप्रती विश्वास, श्रद्धा आणि भाव बळकट होण्यास साहाय्य होते.
४ ई. अज्ञान दूर होणे : सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणार्या सूक्ष्मातील ज्ञानातून एकेका विषयानुरूप अध्यात्मातील अनेक सूक्ष्म पैलू उलगडत जातात. त्यामुळे वाचकांतील अज्ञान दूर होते, तसेच त्यांना अध्यात्म विविध अंगांनी समजून घेता येते. परिणामी वाचकांची ‘अध्यात्म’ या विषयाची दृष्टी व्यापक होत जाते.
४ उ. साधकांना आनंद मिळून त्यांच्या कृतज्ञतेत वाढ होणे : देश-विदेशांतील काही साधकांच्या मनात अनेक वर्षांपासून अध्यात्माविषयी प्रश्न असतात आणि त्यांना त्यांची उत्तरे मिळालेली नसतात. सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणार्या ज्ञानाद्वारे त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. तेव्हा त्या साधकाला उत्तर मिळाल्याचा पुष्कळ आनंद होतो आणि त्याची सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होते.
४ ऊ. साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळणे : साधकांच्या मनातील शंकांचे निरसन झाल्याने त्यांच्या मनाचा गुंता सुटतो, तसेच मन आणि बुद्धी यांत स्पष्टता येते. साधनेतील हा अडथळा दूर झाल्याने त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळते.
४ ए. साधकांची मृत्यूविषयीची भीती दूर होणे : सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणार्या नाविन्यपूर्ण सूक्ष्मातील ज्ञानात ‘नरक, सप्तपाताळ, सप्तलोक, देवतांचे लोक’ इत्यादी विषयांची सविस्तर माहिती असते. ‘या सूक्ष्म लोकांतील जीवन कसे असते ? मृत्यूनंतर व्यक्तीच्या कर्मानुसार तिच्या लिंगदेहाचा प्रवास कसा होतो ? साधना केल्याने मृत्यूनंतरचे जीवन कसे आनंदी बनते ?’ इत्यादी सूत्रांविषयी ज्ञान झाल्याने साधकांना ‘मृत्यूनंतर माझे पुढे कसे होणार ?’, याची भीती रहात नाही. त्यामुळे साधक निश्चिंत मनाने साधना करू शकतात.
४ ऐ. साधकांचे मृत्यूनंतरचे जीवनही सुलभ होणे : साधकाने सूक्ष्म जगाचा अभ्यास केल्याने त्याला ‘मृत्यूनंतरचा प्रवास, विविध सूक्ष्मलोकांचे कार्य, स्वरूप, वर्णन’ आदि सर्व ठाऊक असते. त्यामुळे मृत्यूनंतर सूक्ष्म जग समजून घेण्यातील त्याचा वेळ आणि शक्ती वाचते, तसेच त्याला नवीन सूक्ष्म जगाचा सहजतेने स्वीकार करता येतो. परिणामी त्याचे मृत्यूनंतरचे जीवन सुलभ होते.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सूक्ष्म ज्ञान मिळवण्याची सेवा दिल्याने सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना होणारे विविध लाभ
५ अ. व्यष्टी आणि समष्टी साधना होणे : सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्याची सेवा करतांना ‘अहं वाढणार नाही’, याची काळजी घ्यावी लागते. यासाठी गुरूंच्या चरणी सतत कृतज्ञ रहाणे महत्त्वाचे असते. सूक्ष्मातील ज्ञान मिळवतांना सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकावर वाईट शक्तींची सूक्ष्मातून आक्रमणे होत असतात. यातून रक्षण होण्यासाठी त्या साधकाने नामजपादी उपाय नियमित करणे महत्त्वाचे असते. अशा प्रयत्नांतून त्याची व्यष्टी साधना होत असते. त्याला सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे समष्टीला लाभ होत असतो. यातून त्याची समष्टी साधना होत असते. या प्रक्रियेतून अशा साधकाची आध्यात्मिक प्रगती होत असते.
५ आ. प्रारब्ध न्यून होणे : सूक्ष्मातून ज्ञान मिळवतांना सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांवर वाईट शक्तींची सूक्ष्मातून आक्रमणे होत असतात. हे त्रास सहन केल्याने त्या साधकांचे प्रारब्ध न्यून होते.
५ इ. ज्ञानसेवेत दिशा मिळणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अध्यात्मावर आधारित अनेक प्रश्न सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारतात. त्यामुळे त्या साधकांना ‘सूक्ष्मातून कोणत्या विषयावरील ज्ञान मिळवावे ?’, याची दिशा मिळते. परिणामी त्या साधकांची समष्टी साधना परिणामकारक आणि काळानुरूप होते.
५ ई. ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना कुठल्याही ग्रंथात उपलब्ध नसलेल्या विषयांवरील प्रश्न विचारतात. त्यामुळे असे प्रश्न नाविन्यपूर्ण, अलौकिक आणि सूक्ष्म स्तरावरचे असतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना शक्ती आणि आशीर्वाद देतात. त्यामुळे त्या साधकांची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढत जाते.
५ उ. अध्यात्मातील नाविन्यपूर्ण अशा पुष्कळ पैलूंचे ज्ञान होणे : अध्यात्मातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधतांना सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना अध्यात्मातील नाविन्यपूर्ण अशा पुष्कळ पैलूंचे ज्ञान होत असते. या सेवेद्वारे त्या साधकांना ‘गुरु आणि अध्यात्मशास्त्र यांची व्याप्ती किती विस्तीर्ण अन् सूक्ष्म आहे ?’, याचे ज्ञान होते.
५ ऊ. गुरूंकडून मौनातून शिकण्याचा आनंद मिळणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विविध विषयांवर प्रश्न विचारतात आणि सूक्ष्मातून त्यांना प्रश्नांची उत्तरेही देतात. या प्रक्रियेत त्या साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून मौनातून शिकण्याचा आनंद मिळत असतो.
५ ए. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या आज्ञेनुसार सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ते साधक विविध विषयांवर सूक्ष्मातून ज्ञान मिळवत असतात. या गुरुसेवेमुळे त्यांना गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो.
६. अध्यात्मातील विविध विषयांचे ज्ञान संग्रहित करण्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे कार्य ईश्वरी प्रेरणेनुसार चालू असणे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची व्यष्टी आणि समष्टी साधना पूर्ण झाली आहे. सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणार्या विविध विषयांचे सूक्ष्मातील ज्ञान संग्रहित करण्याचे त्यांचे कार्य अंतर्ज्ञानाने, दूरदृष्टी ठेवून आणि ईश्वरी प्रेरणेनुसार समष्टीच्या कल्याणासाठी चालू आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ४.६.२०२६, वेळ : सकाळी ११, कालावधी : १ मिनिट)
कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे हे राष्ट्रकर्तव्यच आहे !
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’