
नवी देहली : येथील एका बँकेच्या साहाय्यक शाखा व्यवस्थापिका प्रियंका राय यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी आक्रमण केले होते. या आक्रमणाच्या प्रकरणी त्यांनी देहली महानगरपालिकेविरुद्ध उच्च न्यायालयात २० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. आक्रमणाची घटना देहलीतील मालवीय नगरमधील खिरकी व्हिलेज रोड येथे ७ मार्च २०२५ या दिवशी रात्री सुमारे ९ वाजता घडली होती. कुत्र्यांनी त्यांच्या पायांवर ४२ ठिकाणी चावे घेतले होते. याचिकेनुसार राय यांनी १२ लाख रुपये जखमेच्या भागासाठी, ४ लाख २० सहस्र रुपये चाव्यांच्या खुणांसाठी आणि ३ लाख ८० सहस्र रुपये मानसिक वेदनेसाठी मागितले आहेत. न्यायालयाने महापालिकेला उत्तर सादर करण्यासाठी मुदत दिली असून पुढील सुनावणी मार्च २०२६ मध्ये होणार आहे.
यावर्षी देशात कुत्र्यांनी २६ लाखांहून अधिक लोकांना घेतला चावा !
माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत देशात २६ लाखांहून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. वर्ष २०२४ मध्ये ही संख्या ३७ लाखांहून अधिक होती.
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय