लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यघटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द असंवैधानिक आहे. तो काढण्यासाठी राज्यघटनेतील कलम ३६८ (ब) वापरावा लागेल, तसेच तो शब्द काढण्यासाठी वैचारिक संघर्ष करावा लागेल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. उत्तरप्रदेश सरकारचे संयुक्त सचिव श्री. शशिकांत शुक्ला यांनी गोल्फ सिटी येथील त्यांच्या निवासस्थानी एक बैठक आयोजित केली होती. त्या वेळी उपस्थित अनेक प्रशासकीय आणि निवृत्त अधिकारी यांना ते मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील उद्गार काढले. हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने गोल्फ सिटी, कृष्णानगर, तेलीबाग इत्यादी ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ आयोजित केले होते. या अंतर्गत अनेक ठिकाणी बैठका आणि व्याख्याने आयोजित करण्यात आली.

१. प्रा. (श्रीमती) सुषमा मिश्रा यांनी हिंदूंसाठी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले. याला अनेक जिज्ञासूंची उपस्थिती लाभली आणि त्यांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

२. कृष्णानगर येथे सक्रीय हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीत सद्गुरु सिंगबाळ यांनी ‘जीवनात आध्यात्मिक साधनेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले.

३. या संपर्क अभियानात प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘गोल्डी मसाल्या’चे मालक श्री. सुरेंद्र गुप्ता, वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (आय.ए.एस्.) कॅप्टन द्विवेदी, उद्योजक श्री. इंद्रमोहन आनंद, श्री. दयाशंकर पांडे, श्री. चंद्रिका प्रसाद तिवारी इत्यादी अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची भेट घेण्यात आली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !