
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने भारतीय वंशाचा जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असलेला आणि भारतातून पसार असणारा इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक याला देशात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नुकत्याच गृह मंत्रालयात झालेल्या ‘कायदा आणि सुव्यवस्था समिती’च्या बैठकीत घेण्यात आला. ‘झाकीर बांगलादेशात आला, तर प्रचंड गर्दी उसळू शकते. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने सुरक्षादलांची आवश्यकता भासेल; परंतु सध्या इतक्या मोठ्या संख्येने सुरक्षारक्षक तैनात करणे शक्य नाही’, असे बांगलादेशाच्या अधिकार्यांनी प्रवेश नाकारण्याचे कारण देतांना म्हटले आहे.
🇧🇩 Bangladesh denies entry to fugitive Islamist preacher Zakir Naik
🚫 Govt cites risk of chaos and crowd control issue
📅 Planned November visit now uncertain
🇮🇳 Dhaka taunts India over asylum to Sheikh Hasina; such provocation must be firmly answered.
💰 Facing charges of… pic.twitter.com/sDQoNNW3CF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 6, 2025
१. यापूर्वी ‘स्पार्क इव्हेंट मॅनेजमेंट’ या खासगी संस्थेने घोषणा केली होती की, ते नोव्हेंबरच्या शेवटी झाकिर याला बांगलादेशात आणणार आहेत; मात्र आता सरकारच्या या निर्णयानंतर त्या कार्यक्रमावर अनिश्चिततेचे सावट आले आहे.
२. अधिकार्यांनी असेही म्हटले, ‘आम्हाला वाटते की, भारतासह कोणत्याही देशाने दुसर्या देशातील आरोपी किंवा पसार व्यक्ती यांना आश्रय देऊ नये.
भारताने सध्या बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय दिला आहे, त्यावरून हे विधान करण्यात आले. (राजकीय आश्रय वेगळा आणि गुन्हेगाराला आश्रय देणे वेगळे, हे बांगलादेशातील अधिकार्यांना ठाऊक असूनही ते भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने अशा बांगलादेशींना धडा शिकवणे आवश्यक आहे !- संपादक)
३. झाकीर वर्ष २०१६ पासून भारताबाहेर आहे. त्याच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार आणि चिथावणीखोर भाषणांशी संबंधित अनेक गुन्हे नोंद आहेत. तो भारतातून पसार असून सध्या मलेशियात रहातो. अनेक देशांत त्याच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
४. वर्ष २०१६ मध्ये बांगलादेशातील ‘होली आर्टिसन बेकरी’ येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर असे वृत्त समोर आले होते की, त्या आक्रमणकर्त्यांवर झाकीर याच्या भाषणांचा प्रभाव होता.
झाकीर बांगलादेशात आल्यास त्याला आमच्या स्वाधीन करा ! – भारताने केली होती मागणी
झाकीर बांगलादेशात येणार असल्याच्या वृत्तानंतर भारताने अधिकृतरीत्या आक्षेप नोंदवला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसारित करून सांगितले होते की, जर झाकीर बांगलादेशात आला, तर त्याला भारताच्या स्वाधीन करावे.
शेख हसीना यांनीही घातली होती बंदी
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने वर्ष २०१६ मध्ये झाकीर याला देशात येण्यावर बंदी घातली होती.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले