India Slams Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवावे ! – भाविका मंगलानंदन्, संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या सचिव

भारताने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले !

भाविका मंगलानंदन्

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानी सैनिक बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरच्या भागात लोकांचे आंदोलन दडपत आहेत. पाकिस्तानने या लोकांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवावे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांत केली.

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या सचिव भाविका मंगलानंदन् यांनी म्हटले की,

गेल्या काही आठवड्यांत पाकिस्तानी सैन्याने आणि त्यांच्या सहयोगींनी काश्मीरच्या त्यांच्या ताब्यातील भागात आपल्या मूलभूत हक्कांसाठी अन् स्वातंत्र्यासाठी निदर्शने करणार्‍या अनेक निष्पाप नागरिकांना ठार मारले आहे. आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की, त्यांनी बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भागात होणारे गंभीर आणि सततचे मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवावे, जिथे लोक उघडपणे पाकिस्तानची दडपशाही, क्रौर्य अन् संसाधन यांच्या बेकायदेशीर वापराविरुद्ध बंड करत आहेत.

संपादकीय भूमिका

संयुक्त राष्ट्रांत भारताने कितीही वेळा पाकला अशा प्रकारे सुनावले, तरी त्याचा काहीही लाभ झालेला नाही आणि पुढेही होणार नाही; कारण पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांची भाषा समजते, तसेच संयुक्त राष्ट्रे एक बुजगावणेच राहिले असून  त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा करणे हास्यास्पद आहे !