मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास सक्तीने शिकवला पाहिजे ! – पू. भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी

कोल्हापूर, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘युनेस्को’ने मान्यता दिलेल्या २४६ भाषांची जननी संस्कृत भाषा असून ही भाषा इयत्ता १० वीपर्यंत विद्यार्थ्यांना सक्तीची केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठे यांचा इतिहास हा प्रत्येकाला लढण्याची प्रेरणा देतो, तसेच देव-देश-धर्म यांच्याप्रती स्वाभिमान जागृत करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आपण आज राष्ट्र म्हणून जिवंत आहोत. त्यामुळे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक राज्यात भाषांतरित करून इयत्ता १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देशाच्या अभ्याक्रमात सक्तीने शिकवला पाहिजे, असे कळकळीचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते ‘खरे मंगल कार्यालय’ येथे गडकोट मोहिमेच्या निमित्ताने धारकर्‍यांसाठी आयोजित मार्गदर्शनात बोलत होते. या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी मोहिमेच्या निमित्ताने ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे १० दिवसांचे पारायण करण्याच्या सूचना धारकर्‍यांना केल्या.