
बीजिंग : चीनच्या विद्वानांनी ‘भगवद्गीते’स ‘ज्ञानाचे अमृत’ आणि ‘भारतीय संस्कृतीचा संक्षिप्त इतिहास’ असे संबोधले. भगवद्गीतेचा गौरव करतांना ते म्हणाले की, भगवद्गीता आधुनिक जगातील लोकांच्या आध्यात्मिक आणि भौतिक संकटांवरील उपायांचा स्रोत आहे. ‘भारतीय तत्त्वज्ञान परंपरांचा संगम’ नावाच्या परिसंवादात त्यांनी हे विचार मांडले. हा कार्यक्रम भारतीय दूतावासाने आयोजित केला होता.
📖 Chinese Scholars Hail Shrimad Bhagavad Gita as “Nectar of Knowledge”
🇨🇳 Seminar on “Confluence of Indian Philosophical Traditions” organised by Indian Embassy in Beijing
✨ Scholars: Gita is “Nectar of Knowledge” and “Condensed History of Indian Culture”
👨🏫 Prof Zhang… pic.twitter.com/O1dR1a2sBp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 27, 2025

Session 2 – The Bhagavad Gita: Jewel of Indian Spiritual Wisdom at the symposium, Sangamam – A Confluence of Indian Philosophical Traditions at the Embassy of India, Beijing on 25 October.
Veteran Indologist Prof. Zhang Baosheng (Retd., Peking University), Prof. Wang Zhicheng… pic.twitter.com/JV1NkmgyIM
— India in China (@EOIBeijing) October 26, 2025
भारतभ्रमण करतांना भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवले ! – प्राध्यापक झांग बाओशेंग
या परिसंवादात ८८ वर्षीय प्राध्यापक झांग बाओशेंग हे मुख्य वक्ते होते. त्यांनी भगवद्गीतेचे चिनीमध्ये भाषांतर केले आहे. प्रा. झांग यांनी गीतेस ‘भारताचा तत्त्वज्ञान विश्वकोश आणि आध्यात्मिक महाकाव्य’ म्हटले. आजही भारतीय जीवनावर भगवद्गीतेचा पुष्कळ मोठा प्रभाव आहे. प्राध्यापक झांग यांनी सांगितले की, वर्ष १९८४ ते १९८६ या काळात भारतभ्रमण करतांना मी सर्वत्र भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवले होते.
गीता हा प्राचीन युद्धभूमीवरील संवाद ! – प्राध्यापक वांग झी-चेंग
‘ओरिएंटल तत्त्वज्ञान संशोधन केंद्रा’चे संचालक प्राध्यापक वांग झी-चेंग यांनी सांगितले की, गीता हा ५ सहस्र वर्षांपूर्वीच्या प्राचीन भारतीय युद्धभूमीवरील संवाद आहे. हा संवाद आजही आधुनिक जीवनातील गुंतागुंत आणि चिंता सोडवण्यासाठी मार्गदर्शक ठरतो. त्यांनी गीतेतील कर्मयोग, सांख्ययोग आणि भक्तीयोग हे आधुनिक जीवनासाठी मार्गदर्शक असल्याचे नमूद केले.
भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास आवश्यक ! – प्राध्यापक यू लोंग यू
शेन्झेन विद्यापिठातील भारतीय अभ्यास केंद्राचे प्राध्यापक यू लोंगयू यांनी सांगितले की, भारतीय तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक परंपरा अभ्यासासाठी उपयुक्त आहेत अन् चिनी विद्वानांनी ते श्रद्धेने आत्मसात् करावे.
भगवद्गीता आधुनिक जीवनासाठी नैतिक आणि आध्यात्मिक दिशा देणारे अमूल्य मार्गदर्शन ! – भारतीय राजदूत प्रदीपकुमार रावत

भारतीय राजदूत प्रदीपकुमार रावत यांनी सांगितले की, भगवद्गीता केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर आधुनिक जीवनासाठी नैतिक आणि आध्यात्मिक दिशा देणारे अमूल्य मार्गदर्शन आहे. भारताचे तत्त्वज्ञान हे मानवतेसमोरच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते.
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र