पुणे येथील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणी ‘विप्रो’ आस्थापनाचा खुलासा !
पुणे – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘धर्मांतर जिहादा’ची प्रकरणे बाहेर येत आहेत. ‘विप्रो’ आस्थापनातील एका माजी महिलेने ‘धर्मांतर करण्यास नकार दिला म्हणून तिला कामावरून काढल्याची तक्रार ‘हिंदु जनजागृती समिती’च्या माध्यमांतून पत्रकार परिषदेमध्ये केली होती. या प्रकरणी ‘विप्रो’ आस्थापनाने खुलासा केला आहे. ‘विप्रो’ने म्हटले आहे, ‘‘आमच्या आस्थापनात महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते. कोणत्याही अपप्रकाराला थारा न देण्याचे आमचे धोरण आहे. कोणतेही चुकीचे वर्तन, भेदभाव, छळवणूक अथवा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य यांवर गदा आणणार्या गोष्टींना आस्थापनात स्थान नाही. आम्ही या प्रकरणात अन्वेषण यंत्रणांना सर्वोतोपरी साहाय्य करत आहोत. सर्व कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली. अन्वेषण चालू असल्याने यावर भाष्य करू शकत नाही. आम्ही कर्मचार्यांना सुरक्षित वातावरण देण्यास कटीबद्ध आहोत.’’
काय आहे प्रकरण ?
पीडिता ‘विप्रो’मध्ये कार्यरत असतांना तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि एका मुसलमान व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेण्यासाठी प्रचंड मानसिक दबाव आणण्यात आला. यास पीडितेने ठामपणे नकार देत आस्थापनाच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली; मात्र व्यवस्थापनाने आरोपींवर कारवाई न करता पीडितेलाच नोकरीवरून काढून टाकले. अद्याप या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही.

डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क