शाहिद अली या पोलीस अधिकार्याने धर्माच्या आधारे मानसिक त्रास दिल्यामुळे आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप
विभागीय चौकशी चालू !

बदायू (उत्तरप्रदेश) – येथे न्यायालयीन सुरक्षेत तैनात असलेले पोलीस निरीक्षक मेघश्याम गौतम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही; मात्र कुटुंबियांनी ‘पोलीस निरीक्षक शाहिद अली हे मेघश्याम यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली’, असा आरोप केला आहे. या आरोपानंतर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Police Inspector Megh Shyam Gautam Dies by Suicide in Badaun (Uttar Pradesh)
Family alleges that Inspector Mohammad Shahid Ali subjected him to mental harassment on religious grounds, leading to the suicide.
Departmental inquiry underway.
Does attaining a high office change… pic.twitter.com/8LiqX809BO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 6, 2026
धार्मिक कारणांमुळे छळ झाल्याचा आरोप
मेघश्याम यांच्या मुलाने सांगितले की, मेघश्याम अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांनी गुरूंकडून दीक्षा घेतली होती आणि त्यांची भगवान श्रीराम अन् श्रीकृष्ण यांच्यावर श्रद्धा होती. ते कामावरही टिळा लावून जात असत, ज्यावर शाहिद अली यांना आक्षेप होता. शाहिद अली म्हणायचे की, ‘काय तुम्ही पंडित लोक हा टिळा-बिळा लावता ?’ यावर मेघश्याम यांनी उत्तरही दिले होते की, तुम्ही मानत नसाल, तर काय झाले, आम्ही तर मानतो. (असे एखाद्या अल्पसंख्यांक हिंदु अधिकार्याने पाकिस्तानात कुणा मुसलमान अधिकार्याला म्हटले असते, तर काय झाले असते, याचा विचार करा ! भारतात मात्र अल्पसंख्य असणारे मुसलमान हिंदूंवर धर्माच्या आधारावर कुरघोडी करतात आणि हिंदू ते निमूटपणे सहन करतात ! ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद ! संपादक)
कुटुंबियांचे अत्यंत गंभीर आरोप !
मुलाने सांगितले की, कार्यालयात घडलेल्या अशा प्रकारच्या घटना आणि मानसिक दबावामुळे वडील अनेकदा आजारी पडायचे अन् सुटी घ्यायचे. ते गेल्या १५ दिवसांपासून खूप तणावाखाली होते आणि स्थानांतर करून घेण्याविषयी बोलत होते. त्यांनी कुटुंबाला सांगितले होते की, जर त्यांचे स्थानांतर झाले नाही, तर तिथे त्यांच्यासमवेत काही अनुचित घटना घडू शकते.
चौकशी करून कारवाई केली जाईल ! – पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक अंकिता शर्मा यांनी सांगितले की, नातेवाइकांकडून तक्रार मिळाली आहे. नातेवाइकांनी काही ‘कॉल रेकॉर्डिंग्ज’ आणि इतर पुरावे असल्याचा दावा केला आहे, जे अन्वेषण यंत्रणांकडे सोपवले जाणार आहे. विभागीय नोंदींमध्ये याआधी अशी कोणतीही तक्रार नोंदवलेली नव्हती; परंतु नातेवाईक जे काही पुरावे देतील, त्यांची तपासणी केली जाईल आणि तपासात समोर येणार्या तथ्यांच्या आधारावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी