वर्ष २०३१ मध्ये पुढील विधानसभा निवडणूक लढवणार !

चेन्नई (तमिळनाडू) – भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा एक नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. त्यांनी यासंदर्भात नुकतीच एका व्हिडिओ संदेशातून घोषणा केली. यात ते म्हणाले की, आज आम्ही एका चळवळीला आरंभ करत आहोत. आमचा राजकीय पक्ष तमिळनाडूमध्ये वर्ष २०३१ मध्ये होणारी पुढील विधानसभा निवडणूक लढवेल.
Former BJP Tamil Nadu chief K. Annamalai is set to launch his own political party after leaving the BJP
He plans to contest the next Assembly elections in 2031.
During his tenure as State President, BJP's vote share grew by 5 times.#Annamalai #TamilNadu #Politics #TNPolitics… pic.twitter.com/ismAf3k0PJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 5, 2026
अण्णामलाई पुढे म्हणाले की, भाजपचा सदस्य म्हणून रहाणे आणि तमिळ हिताच्या सूत्रांशी जोडलेले रहाणे, या २ गोष्टींपैकी एकाची निवड करणे अत्यंत कठीण होते. मी ४ डिसेंबर २०२५ या दिवशी भाजपला प्रदेशाध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले होते. पक्षाने मला पक्ष सोडण्यापूर्वी निवडणुका पूर्ण करण्यास सांगितले होते, असेही ते म्हणाले.
अण्णामलाई यांनी २ जूनला भाजपला सोडचिठ्ठी दिली. यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, गेल्या १८ महिन्यांपासून वरिष्ठ नेतृत्वाशी माझे विचार जुळत नव्हते.
अण्णामलाई प्रदेशाध्यक्ष असतांना भाजपची मते साधारण ५ पटींनी वाढली !
अण्णामलाई गेली ६ वर्षे भाजपचे नेते राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने वर्ष २०२१ आणि २०२६ च्या विधानसभा निवडणुका लढवल्या. यात भाजपला मते मिळवण्याची टक्केवारी २.६२ टक्क्यांवरून ११.३ टक्क्यांपर्यंत पोचली.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी