काळ्या पैशांतून उभी केली होती २ कोटींची वास्तू !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरुद्ध चालू असलेल्या ‘नशामुक्त जम्मू-काश्मीर अभियाना’च्या अंतर्गत श्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी महसूल विभागासमवेत मिळून अमली पदार्थ तस्कर शेख तसदुक याची अनुमाने २ कोटी रुपये किमतीची ३ मजली इमारत जमीनदोस्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख तसदुक याच्याविरुद्ध ‘एन्.डी.पी.एस्.’ (नार्काेटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्सेस) कायद्यांतर्गत अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर अवंतीपोरा आणि बडगाम पोलीस ठाण्यांत अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणे आधीच प्रलंबित आहेत. तसेच त्याची पत्नी शेख मारूफा हिच्याविरुद्धही पुलवामा येथे ‘एन्.डी.पी.एस्.’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद आहे.
१. अन्वेषणाच्या वेळी पोलिसांना असे आढळून आले की, ही ३ मजली इमारत सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली होती.
२. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या व्यवसायातून कमावलेल्या संपत्तीवर यापुढेही कारवाई चालूच राहील.

नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati