
रत्नागिरी – प्रादेशिक लॉजिस्टिक्स (मालवाहतूक) व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्राहकांशी संवाद वाढवण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या (के.आर्.सी.एल.’च्या) वतीने ३ जून या दिवशी येथे एका उच्चस्तरीय व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मालवाहतूक क्षेत्रातील प्रमुख ग्राहक आणि भागीदार यांच्याशी संवाद साधून कोकण रेल्वेच्या अद्ययावत अन् आगामी मालवाहतूक सुविधांची माहिती देण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा होते. या वेळी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रत्नागिरी अन् कारवार विभागाचे प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक, तसेच केंद्रीय वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनचे (सी.डब्ल्यू.सी.चे) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
परिषदेतील महत्त्वाचे निर्णय
१. रत्नागिरी परिसरातून मुंबईतील ‘जवाहरलाल नेहरू बंदरा’पर्यंत (जे.एन्.पीटी.) कंटेनर वाहतुकीच्या मोठ्या संधींवर बैठकीत विशेष चर्चा झाली. या आर्थिक संधीचा लाभ घेण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने काम करून जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीहून पहिली समर्पित कंटेनर रेल्वे सेवा चालू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
२. या उपक्रमाची व्यावसायिक व्यवहार्यता वाढवण्यासाठी ‘केंद्रीय वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन’ने व्यापार भागीदारांना स्पर्धात्मक (सवलतीचे) दर उपलब्ध करून देण्याची सिद्धता दर्शवली आहे.
३. या बैठकीत खत, अन्नधान्य आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीशी संबंधित अनेक व्यापार भागीदार सहभागी झाले होते. तसेच अजगाव बंदर आणि अंग्रे बंदराचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यामुळे भविष्यातील सागरी आणि रेल्वे वाहतुकीतील समन्वय अधिक बळकट होईल.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित