
प्रश्न
अंक आणि त्यांचे उच्चार यांची स्पंदने एकमेकांना पूरक असतात का ? उदा. ‘१’ हा अंक आणि ‘एक’ हा शब्द यांची स्पंदने एकमेकांना पूरक असतात का ? असल्यास त्याचे शास्त्र काय आहे ? – सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.९.२०२५)
उत्तर
श्री. राम होनप :
१. अंक आणि कुंडलिनीशक्ती यांचा परस्परांशी असलेला संबंध !
व्यक्तीच्या मूलाधारचक्रावर एक सूक्ष्म कमळ असते. त्यात सरस्वतीदेवीची अंकशक्ती आहे. तिला ‘बीजशक्ती’, असेही म्हणतात. अंकशक्तीतून कमळाच्या ९ सूक्ष्म पाकळ्या निर्माण होतात. हे सूक्ष्म कमळ अनुक्रमे ० ते ९ या अंकांशी संबंधित आहेत. यांतील ‘०’ हा आकडा कमळाच्या मधल्या भागाशी संबंधित आणि १ ते ९ आकडे हे कमळाच्या ९ पाकळ्यांशी संबंधित आहेत.
२. अंकांची वैशिष्ट्ये
व्यक्तीच्या मूलाधारचक्रावर असलेल्या कमळातील अंकशक्तीत त्रिगुण आणि पंचतत्त्वे आहेत. या शक्तीचा कार्यानुरूप विस्तार, म्हणजे ० ते ९ अंक आहेत. हे अंक गणिताचे मूळ आहे. त्यामुळे अंकांना गणिताचे ‘नवमूल’ किंवा ‘नवमूळ’, असे म्हणतात. अंकशक्तीचा टप्प्याटप्प्याने झालेला विस्तार, म्हणजे विविध अंक आहेत.
३. सरस्वतीदेवीमुळे अंकशास्त्राची निर्मिती होणे

व्यक्तीच्या मूलाधारचक्रातील अंकशक्ती ही सरस्वतीदेवीचा अंश आहे. अंकशक्तीत सरस्वतीदेवीच्या ‘गणिनी’ आणि ‘मालिनी’, या दोन उपशक्ती आहेत.
३ अ. सरस्वतीदेवीच्या ‘गणिनी’ या शक्तीचे कार्य : अंकांचा क्रम निश्चित करते, ती ‘गणिनी शक्ती’ होय. व्यक्तीच्या मूलाधारचक्रावरील कमळातील अंकशक्तीचे प्रगटीकरण टप्प्याटप्प्याने होते, तेव्हा त्या कमळातून अंकांशी संबंधित एकेक पाकळी उमलते.
जेव्हा व्यक्तीच्या मूलाधारचक्रावर कमळातील पहिली सूक्ष्म पाकळी उमलते, तेव्हा ‘गणिनी’ या शक्तीमुळे त्या पाकळीला ‘१’ हा अंक प्राप्त होतो. त्यानंतर अंकशक्तीतून आणखी एका पाकळीची निर्मिती होते. त्या पाकळीला ‘गणिनी’ या शक्तीमुळे ‘२’ हा अंक प्राप्त होतो. त्यानंतर अनुक्रमे ३ ते ९ पाकळ्यांसाठी अनुक्रमे ३ ते ९ हे अंक प्राप्त होतात. यांतून व्यक्तीच्या मूलाधारचक्रावर ९ पाकळ्यांचे कमळ सिद्ध होते.
३ आ. सरस्वतीदेवीच्या ‘मालिनी’, या शक्तीचे कार्य : सरस्वतीदेवीच्या ‘मालिनी’ या शक्तीने विविध संख्या, गुणाकार, भागाकार आणि वजाबाकी इत्यादी गणितांची माला सिद्ध केली. त्यामुळे तिला ‘मालिनी’, असे म्हणतात. ‘मालिनी’ या शक्तीने गणिताचे ज्ञान ऋषींना सूक्ष्मातून प्रदान केले.
४. ऋषींचे अंकांविषयीचे अद्भुत कार्य !
४ अ. ऋषींना मूलाधारचक्रावरील अंकांचे संपूर्ण ज्ञान होणे : सत्ययुगातील ऋषींना ‘व्यक्तीच्या कुंडलिनीतील मूलाधारचक्रावरील अंकशक्ती, त्यातून निर्माण होणारे अंक, अंकांचे गुणधर्म, अंकांशी संबंधित ‘गणिनी’ आणि ‘मालिनी’ या शक्तींचे कार्य’, यांविषयी सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त झाले.
४ आ. ऋषींनी ईश्वरी ज्ञानाद्वारे अंकांचा आकार आणि उच्चार निश्चित करणे : ऋषींना व्यक्तीच्या मूलाधारचक्रावरील कमळाच्या अंकशक्तीत कुठलाच आकार दिसला नाही. तेथे काहीच न दिसल्याने ऋषींनी त्याला ‘शून्य’ हा अंक दिला. त्यानंतर ऋषींना कमळाच्या पहिल्या पाकळीत १, दुसर्या पाकळीत २, असे अनुक्रमे ९ पाकळीपर्यंत अनुक्रमे १ ते ९ अंक दिसले.
ऋषींनी ‘प्रथम ‘०’ या अंकाशी स्पंदने जुळणारा ‘शून्य’ हा शब्द ईश्वरी ज्ञानाद्वारे शोधला. त्यानंतर ऋषींनी ‘शून्य’ या शब्दाला प्रगट होण्यासाठी आवश्यक असलेला अग्नी मणिपूरचक्रावर सहजतेने मिळतो का ? नंतर तो शब्द पुढे स्वरयंत्राद्वारे सहजतेने प्रगट होतो का ?’, यांचा सूक्ष्मातून अभ्यास केला. या अभ्यासानंतर ऋषींनी ० या अंकाला ‘शून्य’, असा शब्द दिला. नंतर ऋषींनी या अंकाचा आकार आणि उच्चार निश्चित केला. हीच प्रक्रिया ऋषींनी पुढे १ ते ९ या अंकांच्या संदर्भात केली.
४ इ. १० ते १०० या संख्यांची निर्मिती : ऋषींनी सर्वप्रथम ० ते ९ या अंकांचा आकार आणि उच्चार निश्चित केला. या अंकांचा उपयोग त्या काळी असलेल्या लोकांच्या दैनंदिन जीवनात होऊ लागला. त्यानंतर हळूहळू लोकसंख्या आणि आपापसातील व्यवहार वाढू लागले. तेव्हा काही ऋषींनी ० ते ९ या अंकांचा आधार घेऊन पुढे १० ते १०० या संख्यांची नोंद ‘व्यवहार आणि शिक्षण’, यांसाठी केली.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक, वेळ आणि एकूण कालावधी : २.१०.२०२५, सकाळी १०.३०, १५ सेकंद)
|
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!