सामाजिक माध्यमांतून होणार्या टीकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने पोस्ट हटवण्याचा न्यायालयाचा आदेश
(इन्फ्लुएन्सर – सामाजिक माध्यमांद्वारे प्रभाव निर्माण करणारी व्यक्ती)

मुंबई – भारतातील दागिन्यांची विक्री करणारे आस्थापन ‘मालाबार गोल्ड अँड डायमंड्स’च्या विरोधात असलेल्या सामाजिक माध्यमांवरील सर्व ‘पोस्ट’ (लिखाण किंवा चित्र) हटवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या आस्थापनाने हिंदु कार्यकर्ते विजय पटेल यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांना कारागृहात पाठवण्याची धमकी दिली आहे.
Malabar Gold Controversy! 💎
The brand tied up with Pakistani🇵🇰 influencer Aleeshba Khalid – who mocked Operation Sindoor
Activist @vijaygajera exposed the deal – now #BoycottMalabar is trending 🔥
Malabar rushed to the Bombay High Court, which ordered takedown of all critical… pic.twitter.com/oMcEtYG3Y1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 17, 2025
पाकिस्तानी ‘इन्फ्लुएन्सर’ने केला होता ‘ऑपरेशन सिंदूर’चा अवमान
विजय पटेल यांनी सांगितले की, त्यांनी ‘मालाबार गोल्ड अँड डायमंड्स’ने भारताचा अपमान करणार्या पाकिस्तानी ‘इन्फ्लुएन्सर’सह केलेला करार उघड केला; म्हणून आस्थापन त्यांच्यावर कारवाई करू पहात आहे. या ‘इन्फ्लुएन्सर’ने ‘ऑपरेशन सिंदूर’चा अपमान केला होता. मी माझ्या सैन्याच्या गौरवासाठी कारागृहात जाण्यास सिद्ध आहे. पाहूया कोण जिंकतो ? तुमचे पैसे आणि शक्ती कि भारतियांचा पाठिंबा ? केवळ पैशाच्या जोरावर तुम्ही मला गप्प बसवू शकत नाही.

M.P. Ahammed owned Malabar Gold wants to send me to jail for this tweet.
Read it twice and tell me which law I have violated.
Fun fact: They have accepted in the court that they have hired a Pakistani influencer who has posted against our Indian army and called them ‘cowards’… pic.twitter.com/imzXKrMcf6
— Vijay Patel (@vijaygajera) October 17, 2025
(आता हे खाते Account Withheld करण्यात आले आहे !)
हा वाद ६ सप्टेंबर २०२५ दिवशी ब्रिटनमधील बर्मिंगहॅम येथे आस्थापनाच्या नवीन दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यापासून चालू झाला. या कार्यक्रमात पाकिस्तानी ‘इन्फ्लुएन्सर’ अलीश्बा खालिद ही उपस्थित होती. तिच्यासह व्हिडिओ सिद्ध करून आस्थापनाने ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केला. अलीश्बा खालिद हिने मे २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ला ‘भ्याड कृती’ म्हटले होते आणि पाकिस्तानप्रती निष्ठेचा उल्लेख करत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे पोस्टमध्ये लिहिले होते.
मालाबारवर बहिष्कार घालण्याचे सामाजिक माध्यमांतून आवाहन
या भारतविरोधी पोस्टनंतर ‘मालाबार गोल्ड अँड डायमंड्स’वर तीव्र टीका होऊ लागली. लोकांनी ‘बॉयकॉट मालाबार’ (मालाबारवर बहिष्कार घाला) हा ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) ‘ट्रेंड’ (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) केला; कारण आस्थापनाने भारतविरोधी भूमिका घेणार्या पाकिस्तानी ‘इन्फ्लुएन्सर’ समवेत करार केला होता.
या टीकाकारांमध्ये विजय पटेल सर्वांत पुढे होते. सामाजिक माध्यमांतून होणार्या टीकेच्या विरोधात क्षमा मागण्याऐवजी आस्थापनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आस्थापनाने समाजमाध्यमांवरील त्याच्याविरोधातील अपमानास्पद लिखाण हटवण्याची मागणी केली. ‘या पोस्टमुळे आस्थापनाच्या व्यवसायावर परिणाम होत आहे’, असे यात म्हटले होते.
आस्थापनाने न्यायालयात सांगितले की, बर्मिंगहॅममधील दुकानाच्या विज्ञापनासाठी त्यांनी ‘जीएबी स्टुडिओज’ नावाच्या आस्थापनाची नेमणूक केली होती. त्यानेच स्थानिक प्रभावी व्यक्तींना आमंत्रित केले होते, ज्यात ब्रिटनस्थित पाकिस्तानी ‘इन्फ्लुएन्सर’ अलीश्बा खालिद हिचा समावेश होता. अलीश्बाने भारताविरोधी पोस्ट केल्याचे आणि ती पाकिस्तानी असल्याचे आस्थापनाला नंतर कळले.
आस्थापनाचे हे म्हणणे ऐकून न्यायालयाने अंतरिम आदेश दिला की, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘एक्स’ या सामाजिक माध्यमांवरून सर्व अपमानास्पद पोस्ट हटवाव्यात आणि भविष्यात अशा प्रकारच्या लिखाणावर बंदी घालावी.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !