जुना विडी घरकुल येथे हिंदु जनजागृती समितीची धर्मजागृती सभा !

सोलापूर – देव, देश आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी आपल्याला कृतीशील आणि ठोस संघटन निर्माण करावे लागेल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जुना विडी घरकुल भागातील श्री.स.स. नागनाथ अल्ली महाराज सत्संग भवन येथे आयोजित धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. त्यांनी सनातन धर्माचे वैश्विक महत्त्व आणि विविधतेतील समन्वय यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. या सभेला २५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. सद्गुरु स्वाती खाडये यांनी अधिकाधिक धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यासह धर्माचरण करून आध्यात्मिक बळ वाढवण्याचे आवाहन केले.
सभेच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीच्या वर्षा जेवळे यांनी उपस्थितांना समितीच्या कार्याची ओळख करून दिली. सभेत उपस्थित सर्व धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा केली. सभेच्या शेवटी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत विविध संघटना आणि हिंदुत्वनिष्ठांनी विडी घरकुल भागात धर्मशिक्षणवर्ग, प्रशिक्षणवर्ग आणि बालसंस्कार वर्ग चालू करण्याची मागणी केली. श्री. यश मुगड्याल यांनी सूत्रसंचालन केले.
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती