‘१४.९.२०२५ या दिवशी दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथे सद्गुरु स्वाती खाडये यांचे साधकांसाठी मार्गदर्शन होते. त्या वेळी पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७५ वर्षे) हेही तेथे उपस्थित होते. त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सौ. दीपाली पोतदार
अ. ‘सद्गुरु स्वातीताई दिग्रस येथे येणार आहेत’, असे समजल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. माझा भाव जागृत होत होता. घराच्या अंगणातील गवत सोनेरी दिसत होते. त्याकडे पाहून ‘मी वैकुंठात आहे’, असे मला क्षणभर वाटले आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
आ. सद्गुरु स्वातीताई आणि पू. पात्रीकरकाका घरी येण्यापूर्वी माझे यजमान श्री. गोविंद पोतदार सकाळी वास्तूशुद्धी करत होते. तेव्हा सगळीकडे धूर पसरलेला पाहून ‘घरात यज्ञ होत आहे’, असे मला जाणवले. मला अतिशय प्रसन्न वाटत होते.
इ. सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन चालू असतांना त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता. ‘झाडे-वेली, वास्तुदेवता आणि स्थानदेवता आनंदी आहेत’, असे मला जाणवत होते.’

२. सौ. कीर्ती जाजडा
अ.‘सद्गुरु स्वातीताई मार्गदर्शन करत असतांना मला त्या दुर्गादेवीसम भासत होत्या.
आ. मला वातावरणात थंडावा जाणवत होता.
इ. सद्गुरु स्वातीताई आणि पू. पात्रीकरकाका यांच्या अस्तित्वाने मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
ई. माझ्या मनावरील ताण न्यून झाला. मला हलकेपणा जाणवत होता.
उ. सद्गुरु ताईंकडे पाहून माझा ‘कृतज्ञता, कृतज्ञता’ असा नामजप होत होता.
ऊ. मला गुरुचरणांचे स्मरण होत होते. सद्गुरु ताईंकडे पाहिल्यावर मला गुरुचरण दिसत होते.’
३. श्री. कुलदीप दिलीपराव जोशी
अ. ‘सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन ऐकून माझ्या मनावर आलेले आवरण आणि मनातील नकारात्मक विचार नाहीसे झाले.
आ. मला प्रसन्न वाटू लागले आणि हलकेपणा जाणवू लागला.
इ. माझ्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे मिळाल्यामुळे मी निर्विचार स्थिती अनभवू लागलो.
ई. माझे साधनेचे दृष्टीकोन पक्के झाले.
उ. माझा नामजप भावपूर्ण होऊ लागला.
ऊ. आता आमच्या घरात प्रसन्नता जाणवत आहे. कुटुंबियांनी सामूहिक नामजप करायला आरंभ केला.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २०.९.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !