‘द बंगाल फाइल्स’पासून ‘क्रिमसन क्रिसेंट’पर्यंत : कट्टरतावादाच्या दीर्घकाळ चालणार्‍या प्रक्रियेचे चित्रण !

दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाने राष्ट्रीय स्तरावरील समस्येला वाचा फोडली. या चित्रपटाविषयी ‘एक्स’वर १२ लाखांहून अधिक लिखाण (पोस्टस) आणि लाखो अभिप्राय जमा झाले आहेत. हा चित्रपट बंगालमधील हिंसक इतिहासाच्या पुनरावृत्तीवर प्रकाश टाकतो. या चित्रपटात वर्ष १९४६ मधील ‘थेट कृती दिना’च्या (‘ॲक्शन डे’च्या) दंगलीपासून फाळणीला आकार देणार्‍या जातीय विभाजनांपर्यंत घडलेल्या घटना दर्शवण्यात आल्या आहेत. यासह या हत्याकांडामागील वैचारिक आणि धार्मिक प्रवाहही उघड करण्यात आला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री

माझे स्वतःचे ‘बांगला क्रिसेंट : आय.एस्.आय., मदरसा आणि घुसखोरी (२००५) अन् ‘क्रिमसन क्रिसेंट-द लास्ट क्वार्टर (२०२५)’ हे दोन माहितीपट वर्तमानातील अशा प्रकारच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करतात. घुसखोरीचे जाळे, लोकसांख्यिकीय अभियांत्रिकी आणि मदरशांमधील तरुणांमध्ये सातत्याने पोसला जाणारा कट्टरतावाद यांविषयी ते समान वैचारिक धागे दाखवतात. हे ३ चित्रपट एकत्रितपणे एक थरारक सातत्य प्रकट करतात ते, म्हणजे वर्ष १९४६ मध्ये दिसलेली वर्चस्ववादी आक्रमकता आजही कायम आहे. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण युरोप आणि त्यापलीकडे हे होत आहे. वॉशिंग्टन डी. सी. मधील कॅपिटल ज्यू संग्रहालयात झालेल्या वर्ष २०२५ मध्ये गोळीबारामध्ये इस्रायली दूतावासातील २ कर्मचारी ठार झाल्याच्या घटनेचा त्यात समावेश आहे.

१. वैचारिक स्पष्टतेची उत्पत्ती

वर्ष १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात दरियागंज येथील पुस्तके आणि वादविवाद यांचा एक जिवंत परिसंवाद असलेल्या पू. सीताराम गोयल यांच्या ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ या कार्यालयात माझा जीवन प्रवास चालू झाला. महाभारताच्या ज्ञानात बुडालेल्या पू. गोयल यांनी भारतीय इतिहास, मार्क्सवादी-लेनिनवादी ग्रंथ, इस्लामी आणि ख्रिस्ती यांच्या पंथाचे शास्त्र मोठ्या प्रमाणात वाचले होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी हिंदु इतिहासाचा विपर्यास कसा केला, हिंदु इतिहासकारांचे योगदान कसे मिटवले आणि त्याचा वारसा कसा खराब केला, याचे त्यांनी कागदपत्रांच्या माध्यमातून एकत्रीकरण केले आहे.

२. व्यक्तींना खलनायक बनवण्यापेक्षा त्यांच्या विचारधारांची चौकशी करण्याची पू. गोयल यांची शिकवण

मी व्यक्तींना खलनायक बनवण्यापेक्षा त्यांच्या विचारधारांची चौकशी करायला हवी, हे पू. गोयल यांच्याकडून शिकलो. हस्तलिखितांच्या ढिगार्‍यांमध्ये डॉ. लोकेश चंद्र, डॉ. कोनराड एल्स्ट, राजिंदर सिंग आणि मुकुंद लाथ या अभ्यागतांचा एक स्थिर प्रवाह आला. त्यांपैकी प्रत्येक जण त्यांनी मिळवलेली माहिती आणि जागतिक दृष्टीकोन घेऊन आला. तरुण मनासाठी आणि त्यांच्या महत्त्वाच्या शंकांसाठी ते गुरुकुल होते. भारताच्या सभ्यतेच्या स्मृतीमध्ये रुजलेली; परंतु व्याप्तीमध्ये जागतिक असलेली पुराव्यांवर आधारित विचारसरणी, घोषणा किंवा द्वेषाविना रुजलेली विचारधारा कशी उघड करू शकते, हे त्यांनी मला दाखवून दिले. ही एक अशी विद्या शाखा आहे, जिने नंतर ‘बांगला क्रिसेंट’ आणि ‘क्रिमसन क्रिसेंट’ला आकार दिला.

मयंक जैन

३. उपहासाच्या माध्यमातून प्रतिकार

‘व्हॉईस ऑफ इंडिया’मधील दुपारची वेळ चौकशी आणि कविता यांनी भरून जात होती. तेथील वादविवाद पहातांना, कोणत्याही हुकूमापेक्षा एक-दोन ओळींचे लिखाण अधिक प्रभावीपणे कट्टरतेला छेदू शकते, हे मी पाहिले. मिर्झा गालिबने अनादराची भावना २ ओळीत व्यक्त केली आहे, ‘‘शराब पीने दे मस्जिद में बैठ कर गालिब, या वो जगह बता जहां खुदा नहीं होता ।’’ (मशिदीमध्ये दारू प्यायला अनुमती द्यावी किंवा देव अस्तित्वात नसलेली जागा दाखवावी), ही विनंती करून त्याने पोकळ धार्मिक विधीचा उपहास केला आणि बळजोरी नव्हे, तर बुद्धीमत्ता धर्मांधता न्यून करू शकते, हे उघड केले. सोव्हिएत बंडखोरांच्या स्टॅलिनविषयीच्या विनोदांनीही असेच काम केले. धर्मांधतेला प्रतिकार म्हणून उपहास करण्याची ही अंतःप्रेरणा माझ्या स्वतःच्या कार्याद्वारे माझ्यासह राहिली.

४. ‘बांगला क्रिसेंट’मध्ये काय दाखवले आहे ? 

‘बांगला क्रिसेंट’ने बंगालच्या पूर्णपणे सुरक्षित नसलेल्या सीमेवरील वास्तव उघड केले. वहाबी देणगीदारांनी अर्थसाहाय्य केलेले आणि आय.एस्.आय.च्या संचालकांशी जोडलेले नोंदणीकृत नसलेले मदरसे; के.पी.एस्. गिल, प्रकाश सिंग आणि आर्.के. ओहरी या भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस्.) दिग्गजांनी जारी केलेल्या या कागदपत्रांमध्ये घुसखोरीचे मार्ग, लोकसंख्येतील पालट आणि त्यांना सक्षम करणारा राजकीय भ्रष्टाचार यांच्या कागदपत्रांचे एकत्रीकरण केले आहे. बांगलादेशी कार्यकर्ते सलाम आझाद एकदा म्हणाले, ‘तालिबान शैलीतील शिकवण कोणत्याही शिक्षेविना भरभराटीला आली.’

४ अ. भारतात मोगलस्तान स्थापित करण्याची मुसलमानांची महत्त्वाकांक्षा : हा आराखडा काही नवा नाही. वर्ष १९३३ मध्ये रहमत अली याने ‘पाकिस्तान’ हे नाव सिद्ध केले आणि भारतातील अनेक भाग ‘पाकिस्तान’ करण्याविषयी नकाशे रेखाटले. नंतर जिना यांनी पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान यांना जोडणार्‍या ‘कॉरिडॉर’ची (सुसज्ज महामार्गाची) मागणी केली. ही कल्पना व्ही.पी. मेनन यांनी नोंदवली आहे. अनेक दशकांनंतर डॉ. जे.के. बजाज यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सिद्ध झालेल्या लोकसांख्यिकीय मार्गिकेची ओळख पटवली, ज्यामध्ये या योजनेचे विलक्षण प्रतिध्वनी होते. आय.एस्.आय. समर्थित मोगलस्तान संशोधन संस्थेच्या नकाशांनी भारतीय जिल्ह्यांना ‘भविष्यातील पाकिस्तानी प्रांत’ म्हणून हिरवे रंग दिले आणि त्यानंतर या महत्त्वाकांक्षा कागदावरून लोकसंख्येकडे वळल्या.

४ आ. ‘गजवा ए हिंद’च्या सिद्धांताला देवबंदचे समर्थन : धर्मशास्त्रीय स्तंभ प्रादेशिक स्तंभाशी जुळला. फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘दार उल उलूम देवबंद’ला एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रश्न विचारले गेले की, ‘हदीस’मध्ये सांगितलेले भारतावरील आक्रमण ‘गजवा ए हिंद’ (काफीरांना ठार करण्यासाठीचे युद्ध) त्यांच्या हुतात्म्यांना स्वर्ग देण्याचे वचन देतो का ? देवबंदच्या सकारात्मक उत्तराने अनेकांना धक्का बसला आणि त्याला सैद्धांतिक समर्थन अजूनही कायम आहे, हे उघड झाले. जेव्हा विचारधारा विजयाला पवित्र करते, तेव्हा लोकसांख्यिकीय धोरणाला नैतिक आधार मिळतो.

५. ‘क्रिमसन क्रिसेंट-द लास्ट क्वार्टर (२०२५)’ माहितीपटाविषयी

‘क्रिमसन क्रिसेंट’ हा माहितीपट अचूकपणे ‘गजवा-ए-हिंद’ची कथा, जिना यांची इस्लामी ‘कॉरिडॉर’ची दृष्टी, रहमत अलीचे नकाशे आणि मोगलस्तान संशोधन संस्थेचे अंदाज एका माळेमध्ये कसे एकत्र येतात, हे तो दर्शवितो. वेस्ट पॉईंट येथील ‘कॉम्बॅटिंग टेररिझम सेंटर’च्या (‘सीटीसी’ – आतंकवादाशी लढा देण्याच्या केंद्राच्या) संशोधनात असे दिसून आले आहे की, इंडोनेशियातील अल-इस्लाम मदरशातील ९१ टक्के विद्यार्थ्यांनी मुसलमानेतरांशी लढणे आणि त्यांना ठार मारणे, हे आपले कर्तव्य असल्याचे घोषित केले. ‘दार उल इस्लाम’च्या मध्यम शाळांमध्येही ३५ टक्के विद्यार्थ्यांनी धर्माने प्रेरित हिंसाचाराचे समर्थन केले. ज्या विद्यार्थ्यांनी मानवतेला स्वाभाविकपणे वाईट म्हणून पाहिले, ते हिंसाचाराला पाठिंबा देण्याची शक्यता ११ पटीने अधिक होती. तो खुलासा ‘क्रिमसन क्रिसेंट’मधील ‘९१ टक्के मदरसा फॉल्टलाईन’ बनला आणि मी भारतातील मदरशांच्या माहितीकडे कसे पाहिले, त्याची योजना सिद्ध केली.

५ अ. नाझीवाद, साम्यवाद आणि कट्टरपंथी जिहाद या निरंकुश विचारधारा उघड करणारा माहितीपट ! : देहली ते बांगलादेश सीमेपर्यंतच्या प्रत्यक्ष कामातूनही हीच पद्धत दिसून आली. मदरशातील विद्यार्थ्यांनी ‘दार्स-ए-निझामी’ आणि ‘फिकह’ यांचा उल्लेख करून हिंदूंना काफिर अन् जिहादला कर्तव्य म्हणून संबोधले. ‘क्रिमसन क्रिसेंट’ नाझीवाद, साम्यवाद आणि कट्टरपंथी जिहादवाद या निरंकुश विचारधारा समांतर आहेत, यादृष्टीने पहातो. प्रत्येक विचारधारा मतभेद दाबून टाकते, हिंसाचाराचे उदात्तीकरण करते आणि एकाच बाजूचे सत्य कार्यवाहीत आणते. देहली येथील सुंदरनगरीमध्ये या माहितीपटाच्या चित्रीकरणाला तणावपूर्ण वळण लागले. तेथील एका मदरशातील मुलाखतीचे रूपांतर धक्काबुक्की आणि धमक्यांमध्ये झाले, जे ‘विचारधारेच्या युद्धभूमीचे’ प्रतिबिंब होते, असे एस. अग्रवाल यांनी वर्णन केले आहे. पू. सीताराम गोयल आणि पू. राम स्वरूप यांनी चेतावणी दिल्यानुसार विचारधारा आधी स्वतःच्या अनुयायांना फसतात.

६. जागतिक पालट : टेक्टोनिक (संरचनात्मक) पालटांमधील आशा 

सध्याच्या सर्वेक्षणांमधून वेगाने पालटणारी मनोवृत्ती दिसून येते. इराणमध्ये जवळजवळ अर्धी लोकसंख्या धार्मिक ओळखींपासून गैरधार्मिक ओळखीकडे वळली आहे. इंटरनेटच्या प्रवेशामुळे मशिदी बंद झाल्या आहेत आणि निदर्शने होत आहेत. पाकिस्तानात आत्मघातकी बाँबस्फोटांसाठीचे समर्थन वर्ष २००४ मधील ४१ टक्क्यांवरून वर्ष २०१४ पर्यंत ३ टक्क्यांपर्यंत घसरले. संपूर्ण अरब जगात तरुणवर्ग ईश्वरशाही आणि सक्तीच्या विधींपासून दूर जात आहे.

७. सौदी अरेबियाच्या युवराजांनी पारंपरिक विचारांना आव्हान देऊन सुधारणांचे संकेत देणे 

सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान हे सध्याच्या प्रमाणात इस्लाममधील रशियाचे दिवंगत नेते गोर्बाचेव्ह यांच्यासारखे वागतात. हदीसवर अंकुश ठेवणे, धार्मिक पोलिसांना बाजूला करणे आणि १.५ ट्रिलीयन डॉलर्स (एकावर १२ शून्य) ‘निओम’च्या (‘एन्.ई.ओ.एम्.’च्या – अक्षय्य ऊर्जेवर चालवण्यात येणारे एक नियोजित शहर) तंत्रज्ञानविषयक दृष्टीकोनाकडे पुनर्निर्देशित करणे या गोष्टी ते करत आहे,. तसेच अबू धाबी येथे वर्ष २०२४ मध्ये उभारलेले बी.ए.पी.एस्. (बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्था) स्वामीनारायण मंदिर, ज्याचे उद्घाटन शेख यांनी केले, ते प्रस्थापित पारंपरिक विचारांना आव्हान देतात आणि सुधारणांचे संकेत देतात.

८. तळागाळामध्ये डिजिटल साक्षरता करणे, हे नागरी कर्तव्य !

‘क्रिमसन क्रिसेंट’ हा माहितीपट तंत्रज्ञानाच्या दुहेरी धार असलेल्या तलवारीचाही मागोवा घेतो. कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आता कट्टरतावाद आणि सुधारणा या दोन्हींचा प्रसार करते. सलाफी शिक्षणसंस्था प्रवचनांसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करते; परंतु ‘रेडिट’च्या मुसलमान आणि पूर्वीचे मुसलमान यू ट्यूब वाहिन्यांसारखे मंच सिद्धांताला आव्हान देणार्‍या अन् श्रद्धेच्या बाहेर वैयक्तिक प्रवास करणार्‍या कोट्यवधी लोकांना सामायिक करतात अन् त्यांना अशा संभाषणात ओढतात. परिणामी डिजिटल साक्षरता आता नागरी कर्तव्य असण्याचे नेमके हेच कारण आहे.

९. ‘क्रिमसन क्रिसेंट’ या संशोधनात्मक माहितीपटाला लाभलेला प्रतिसाद

स्वयं अर्थसाहाय्य करणारे असूनही ‘क्रिमसन क्रिसेंट’ या माहितीपटाने ‘जिहाद वॉच’, ‘संगम टॉक्स’, नीरज अत्री यांचे ‘पॉलिटिकली इनकरेक्ट’, ‘अपवर्ड’, ‘पॉलिटिकल अड्डा’, ‘सुदर्शन न्यूज’, ‘सनातन प्रभात’, ‘पीगुरुज’ आणि ‘क्यूव्हाईव्ह टीव्ही’ यांसारख्या वाहिन्यांमधून ५० सहस्रांहून अधिक यू ट्यूब दृश्ये मिळवली आहेत. इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक यांवरील रिल्स (छोट्या ध्वनीचित्रफिती) आणि उतारे यांच्या माध्यमातून आणखी २० लाखांहून अधिक जण जोडले आहेत. ही एका संशोधनात्मक माहितीपटासाठी तळागाळातील एक प्रगतीदर्शक घटना आहे.

१०. दरियागंजपासून आतापर्यंतचा प्रवास 

दरियागंजमधील तळघरातील कार्यालय हे कामाच्या जागेपेक्षा अधिक म्हणजे ते कल्पनांची एक बिंदू होते. ‘व्हॉईस ऑफ इंडिया’मध्ये ग्रंथांची पडताळणी केली जात होती, त्यांची पूजा केली जात नव्हती. प्रश्नांचे स्वागत केले जात होते. ते दाबून टाकले जात नाहीत. घोषणांनी चाललेल्या या जगात पू. गोयल यांची व्यक्तींना खलनायक न दाखवता सिद्धांतांचा अभ्यास करणे, ही पद्धत दुर्मिळ आहे. ‘बांगला क्रिसेंट’ आणि ‘क्रिमसन क्रिसेंट’ या माहितीपटांचा उदय या मूल्यांमधून झाला. ती शिकवण, पैशाचे मार्ग, स्थलांतराचे मार्ग आणि नकाशे जे वास्तवात येणार, असे होते अन् त्यांना नागरिकांनी विरोध केला, याविषयी माहिती देणार्‍या वह्या आहेत. धोरणकर्ते, शिक्षक आणि नागरिक यांच्यासमोरील आव्हान स्पष्ट आहे. हिंसेचे समर्थन करणारे सिद्धांत, त्याला सक्षम करणारी लोकसंख्या, त्याचे संरक्षण करणारे प्रदेश आणि त्याचा प्रचार करणारे जाळे ही वैचारिक यंत्रणा नष्ट करण्यासाठी आपण पुरेसा आराखडा सिद्ध करू शकतो का ? जर आपल्याला शक्य झाले, तर पुढच्या पिढीला अल्प प्रमाणात वैचारिक यंत्रे आणि अधिक प्रमाणात मानवी वारसा मिळू शकेल. म्हणूनच हे माहितीपट अस्तित्वात आहेत. जुन्या देहलीतील ‘व्हॉईस ऑफ इंडिया’च्या तळघरातील त्या प्रेरणादायी कार्यालयात पहिल्यांदा बोलल्या गेलेल्या वाक्याचा तो एक दीर्घ प्रतिध्वनी आहे. एखाद्या विचारधारेची हालचाल पहा; कारण विचारधारा नेहमीच स्वतःचे अनुयायी किंवा फसणारे लोक निवडते.

लेखक : मयंक जैन

(मयंक जैन हे माहितीपट निर्माते आणि ‘रूट स्टॉक फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक आहेत. ‘क्रिमसन क्रिसेंट-द लास्ट क्वार्टर’ हा त्यांचा अलीकडील माहितीपट दक्षिण आशिया आणि युरोपमधील कट्टरतावादावरील २ दशकांच्या क्षेत्रीय कार्यावर आधारित आहे.)