
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानच्या चारही मुंड्या चीत केल्या. त्यात भारतीय महिला सैनिक आणि अधिकारी यांचाही अत्यंत मोलाचा असा वाटा होता. सर्व राष्ट्रांनी त्यांना पायघड्या घातल्या, त्यांचे कौतुक केले, त्यांचा सन्मान केला आणि संपूर्ण विश्वानेही भारतीय सैन्याचा वचक मान्य केला. आणखीन थोडे दिवस युद्ध चालले असते, तर पाकिस्तानला आशिया कप क्रिकेट सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा देशच शिल्लक राहिला नसता हे मात्र निश्चितच…! भारतीय सैन्याच्या २ महिला अधिकार्यांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन आणि प्रसारमाध्यमांपुढे जाऊन आपले सैन्य किती मोलाची आणि भरीव कामगिरी करत आहे, याविषयी संपूर्ण विश्वाला अत्यंत मौलिक माहिती पुरवली.

‘हिरो’ आस्थापनाकडून अपमानास्पद विज्ञापन

असे असले, तरी भारतातीलच ‘हिरो’ या दुचाकी आस्थापनाने एक विज्ञापन सिद्ध केले. त्यात असे दाखवले की, २ दुचाकीस्वार एका सैनिकी ट्रकच्या मागे जातात, ज्यात महिला सैनिक बसलेल्या असतात. एका महिला सैनिकाला दुचाकीस्वारांमधील १ दुचाकीस्वार १ अंगठी देतो आणि लग्नाकरता मागणी घालतो. ती महिला सैनिकही लाजून ती मागणी मान्य करते. किती हास्यास्पद आहे ! ज्या भारतीय हिंदूंनी आपल्या सैन्याचे कौतुक केले, स्तुती सुमनांचा वर्षाव केला, त्यांच्या कामगिरीने त्यांचे उर भरून आले, अशा महिला सैनिकांना केंद्रस्थानी ठेवून असे थिल्लर, बाजारू आणि गल्लाभरू विज्ञापन दूरचित्रवाणीवरून दाखवले जाते, हे नक्कीच लांच्छनास्पद अन् सर्व राष्ट्रभक्त हिंदूंना संताप आणणार आहे, हे नक्कीच ! दिवाळी हे हिंदूंचे मोठे सण तोंडावर आलेले असतांना केवळ स्वतःचा धंदा वाढावा; म्हणून अशी थिल्लर विज्ञापने दाखवणार्या आस्थापनाला, तसेच ते प्रसारित करणार्या दूरचित्रवाहिन्यांना कठोर शिक्षा करावी. यासह सर्व राष्ट्राभिमानी हिंदूंनी अशा दुचाकी आस्थापनांवर बहिष्कार घातल्यास आश्चर्य ते काय ?
– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !