
१०.१०.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘सद्गुरु आणि संत यांनी सांगितलेली सूत्रे, तसेच आपत्काळात वैद्य आणि औषधे उपलब्ध नसतांना रुग्णाची केवळ सप्तचक्रे नव्हेत, तर शरिरात कुठेही असलेला अडथळा शोधून तो दूर करणे आवश्यक असणे’ आदी सूत्रे पाहिली. आज पुढील भाग पाहू.
(भाग ३)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/965511.html

८. आरंभी पू. आजींसाठी नामजप म्हणून अंक आणि अक्षरे येणे अन् उपाय चालू केल्यानंतर दहाव्या दिवशी त्यांची स्थिती सुधारल्याने ‘कृष्ण’, हा शब्दाचा नामजप आल्याचे गुरुदेवांनी सांगणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : पू. दातेआजींसाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार सलग १० दिवस उपाय केल्यावर पू. आजींच्या डाव्या हाताची हालचाल होऊ लागली. त्यांचे डोळे थोडे उघडू लागले. आम्ही त्यांना काही विचारले, तर त्या ‘हो’ किंवा ‘नाही’, असे उत्तर देऊ लागल्या. प्रारंभी नामजप म्हणून अंक यायचे, नंतर नामजप म्हणून कधी अंक आणि कधी अक्षरे येऊ लागली. १७.६.२०२४ या दिवशी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) पू. आजींना स्वतःला नामजप करायला सांगितला. त्या वेळी त्यांच्यासाठी ‘कृष्ण’, हा नामजप आला. याविषयी गुरुदेवांनी सांगितले, ‘‘आता त्यांची स्थिती थोडी सुधारली आहे. त्यामुळे शब्दाचा नामजप आला.’’ अशा रितीने परिवर्तन होत गेले. प्रतिदिन गुरुदेव पू. आजींच्या खोलीत येतात आणि ‘शरिराच्या कोणत्या भागासाठी अचूक नामजपादी उपाय करायचे ?’, हे सांगतात. ‘उपाय हाताच्या तळव्याने करायचे कि बोटांनी करायचे ?’, हेही ते सांगतात. पू. आजींचे कुटुंबीय त्यांच्यासाठी नामजप करतात आणि मीही थोडा वेळ उपाय करतो.
पू. आजी नाकाने श्वासोच्छ्वास करू शकत नाहीत; म्हणून त्या तोंडाने श्वासोच्छ्वास करतात. त्यामुळे त्यांचे तोेंड उघडे आहे. आपल्याला ठाऊक आहे की, तोंड उघडल्यावर घशाला कोरड पडते. पू. आजींना किती त्रास होत असेल !
९. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे रात्रीपासून ‘ज्ञ’ हा नामजप केल्यावर सकाळी पू. आजींनी २ – ३ वेळा डोळे उघडून पहाणे

सौ. ज्योती दाते (पू. आजींची मोठी सून, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) : काल रात्री सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. आजींकडे आले होते. त्यांनी आम्हाला ‘हाताची पाचही बोटे एकत्रित करून पू. आजींच्या अनाहतचक्राच्या २ इंच वर आणि आज्ञाचक्राच्या २ इंच वर न्यास करून ‘ज्ञ’ हा जप करायचा आहे’, असे सांगितले. काल रात्रीपासून आतापर्यंत आम्ही त्यांच्यासाठी उपाय करत आहोत. काल जितका प्रतिसाद होता, त्यापेक्षा आज थोडा अल्प आहे; पण सकाळपासून २ – ३ वेळा त्यांनी डोळे उघडून पाहिले. आता गुरुदेव आल्यावर त्यांचे डोळे पूर्णपणे उघडले आहेत. त्यांच्या हाताचीही हालचाल होत आहे. पू. आजींसाठी २४ घंटे उपाय चालू असतात. गुरुदेव उपाय शोधत असतांना त्यांचा हात जसजसा पू. आजींच्या पायापासून वर येत होता, तसतसा
पू. आजींचा श्वासोच्छ्वास गतीने होऊ लागला.
१०. ‘पं’ हा जप केल्यावर उपस्थित संतांना पू. आजींमध्ये जाणवलेले पालट
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पू. आजींच्या पायांची हालचाल होऊ लागली आहे. हे उपाय २ – ४ घंटे करावे लागतात. ‘पं’ हा नामजप करायचा आहे.
पू. (सौ.) संगीता जाधव : पू. आजींच्या चेहर्यावर शांतता वाटत होती. ‘त्यांच्या मनात कोणतेच विचार नाहीत’, असे मला वाटले.
सद्गुरु अनुराधा वाडेकर : ‘जप करण्यापूर्वी त्यांच्या चेहर्याकडे पाहिल्यावर त्रस्तता आणि चेहर्यावर ताण आहे’, असे वाटत होते; पण जप केल्यावर त्यांचा चेहरा शांत आणि स्थिर वाटत आहे.
सद्गुरु स्वाती खाडये : ‘पं’ हा जप केल्यानंतर पू. आजींचा चेहरा टवटवीत वाटत आहे. ‘त्यांच्या कपाळावरील सूज न्यून झाली आहे’, असे वाटते.
पू. (सौ.) सुनीता खेमका : जप केल्यानंतर पू. आजींच्या चेहर्याकडे पाहून आनंद जाणवत आहे.
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : पू. आजींचा चेहरा शांत, स्थिर आणि आनंदी वाटत आहे.
११. पू. आजी १५ दिवसांपासून बेशुद्धावस्थेत असूनही त्या आनंदात असल्याचे गुरुदेवांनी सांगणे
पू. (सौ.) संगीता जाधव : गुरुदेव, तुम्ही येण्यापूर्वी पू. आजी शांत होत्या. तुम्ही आल्यानंतर त्यांची हालचाल होऊ लागली. प्रारंभी काहीच हालचाल होत नव्हती; पण नंतर त्या झोपेतून उठल्याप्रमाणे वाटत होत्या. (सौ. ज्योती दाते यांना उद्देशून) आरंभीची त्यांची स्थिती कशी होती आणि आता कशी आहे ?
सौ. ज्योती दाते : ७.६.२०२४ या दिवसापासून पू. आजी बेशुद्ध आहेत. आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांना पहात आहोत. त्यांना पाहिल्यावर ‘त्यांना काही झाले आहे’, असे वाटत नाही. प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘‘त्या आतून पुष्कळ आनंदात आहेत. मागील १५ दिवसांपासून त्या याच स्थितीत आहेत. अशा स्थितीत आपण झोपू शकत नाही. त्यांच्या श्वासाची गतीही अधिक आहे. जर आपण २ मिनिटांसाठीही असा श्वास घेण्याचा प्रयत्न केला, तर दमून जाऊ, तरीही त्या आनंदात आहेत.’’
पू. (सौ.) संगीता जाधव : त्यांच्याकडे पाहून ‘त्यांना स्वतःला काहीतरी सांगायचे आहे’, असे वाटत आहे. ‘जे विचारले आहे, ते त्यांना समजले आहे आणि त्याचे उत्तर त्यांनाच द्यायचे आहे’, असे वाटत आहे. ‘त्यांचे डोळे बोलत आहेत’, असे वाटते. त्यांचे डोळे पूर्णपणे उघडले आहेत.
पू. (सौ.) सुनीता खेमका : त्यांना पाहिल्यावर ‘पितामह भीष्म जसे शरपंजरी पडले होते आणि त्यांना भेटायला श्रीकृष्ण आला होता’, हे महाभारतातील दृश्य डोळ्यांसमोर आहे’, असे मला वाटत आहे.
१२. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी पू. आजींच्या डोळ्यांकडे पाहून केलेले सूक्ष्म परीक्षण !
सद्गुरु अनुराधा वाडेकर : तुम्ही आता पू. आजींचे डोळे पहायला सांगितले ना ! तेव्हा मी परीक्षण करत होते. त्या वेळी त्यांनी अधिक प्रमाणात डोळे उघडले; कारण आम्ही परीक्षण व्यवस्थित करू शकू. ते त्यांना आतून लक्षात आले आणि त्या आम्हाला प्रतिसाद देत आहेत अन् साहाय्य करत आहेत. त्यांनी डोळे अधिक उघडले. त्या पापण्यांची उघडझाप करत नव्हत्या. त्यांच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर माझा ‘निर्गुण’, हा जप चालू झाला. त्यांच्या डोळ्यांकडे पाहून ‘ते निर्गुण स्थितीत आहेत’, असे मला अनुभवता आले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : फार छान परीक्षण आहे !
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/966434.html
(क्रमशः)
|
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !