
११.१०.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘अक्षर आणि अंक यांचा जप केल्यावर सद्गुरु आणि संत यांना पू. (श्रीमती) दातेआजींमध्ये जाणवलेले पालट, तसेच सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी पू. आजींच्या डोळ्यांकडे पाहून केलेले सूक्ष्म परीक्षण’ आदी सूत्रे पाहिली. आज पुढील भाग पाहू.
(भाग ४)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/965797.html

१३. पू. आजींसाठी उपाय करतांना त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

१३ अ. उपाय केल्यापासून पू. आजींच्या श्वासोच्छ्वासाची गती आणि हृदयाचे ठोके सामान्य होऊ लागणे

सौ. ज्योती दाते (पू. आजींची मोठी सून, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) : इतक्या दिवसांत माझ्या लक्षात आले की, उपायांच्या वेळी पू. आजींचा श्वासोच्छ्वास पुष्कळ जोराने होतो. ‘त्यांच्या गळ्याच्या ठिकाणी जोरात हालचाल चालू आहे’, असे दिसत होते. आज ते सर्व न्यून वाटत आहे. त्या शांत वाटत आहेत. त्यांनी आज अधिक वेळ डोळे उघडे ठेवले आहेत. आता त्यांच्या श्वासाची गतीही सामान्य झाली आहे. निरोगी व्यक्तीसाठी श्वासोच्छ्वासाची गती १८ ते २० प्रती मिनिट, इतकी असते. पू. आजींच्या श्वासोच्छ्वासाची गती ४० प्रती मिनिट, इतकी असायची. आता उपाय करून ती ३५, ३०, २७ अशी होत होत २२ प्रती मिनिट, इतकी झाली आहे. निरोगी व्यक्तीसाठी हृदयाचे ठोके ६० ते १०० प्रती मिनिट, इतके असावे लागतात. १० दिवसांपूर्वी पू. आजींचा पल्स रेट (हृदयाचे ठोके) १३८ ते १४० प्रती मिनिट, असा होता. आता तो ८० ते ८५ प्रती मिनिट आहे, म्हणजे सर्वसाधारण होऊ लागला आहे.

१३ आ. पू. आजी आजारी असूनही त्यांच्याकडून आनंद प्रक्षेपित होणे आणि ‘त्या साधनेसाठी शक्ती देत आहेत’, असे जाणवणे
सद्गुरु अनुराधा वाडेकर (सौ. ज्योती दाते यांना उद्देशून) : ७.६.२०२४ या दिवसापासून तुम्ही उपाय करत आहात. ‘तुम्ही काय अनुभवले ?’, हे सांगू शकाल का ?
सौ. ज्योती दाते : ७.६.२०२४ या दिवसापासून पू. आजी बेशुद्ध आहेत. उपाय चालू आहेत. त्या गंभीर आजारी आहेत. घरी कोणी असे गंभीर आजारी असल्यास वातावरण दुःखी असते आणि कुटुंबियांवर ताण असतो. आम्हाला वाटते की, हे वेगळेच पर्व चालू आहे. पू. आजींकडून आनंद प्रक्षेपित होतो. त्यांना पाहूनही पुष्कळ चांगले वाटते. ‘त्या माझी साधना वाढवण्यासाठी शक्ती देत आहेत’, असे मला वाटते. मला वाटते की, पू. आजी मला सांगत आहेत, ‘तू पहात आहेस ना, गुरुदेव कसे आहेत ! आता मागे जायचे नाही.’
‘पू. आजींच्या सेवेत दिवस-रात्र कसे होतात ?’, हेही माझ्या लक्षात येत नाही. मला पुष्कळ आनंद जाणवतो.
१३ इ. गुरुदेवांच्या संकल्पामुळेच पू. आजींसाठी उपाय करू शकणे
सद्गुरु अनुराधा वाडेकर (डॉ. नरेंद्र दाते यांना उद्देशून) : पू. आजींसाठी जे उपाय सांगितले जातात, ते तुम्ही रात्रंदिवस करता. त्या वेळी तुम्ही काय अनुभवता ?
डॉ. नरेंद्र दाते (पू. आजींचा मोठा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) : गुरुदेव आम्हाला दिवसातून ३ वेळा वेगवेगळे नामजपादी उपाय सांगतात. गुरुदेवांच्या संकल्पामुळेच सर्वकाही होते. आम्ही केवळ उपाय करण्याचा प्रयत्न करतो; पण त्यांच्या संकल्पाने आणि इच्छेनेच सर्व होत आहे. आम्ही आश्रमात आहोत. आश्रमाचे चैतन्यही आहे. गुरुदेव खोलीत येतात, तेव्हा आनंदच जाणवतो. कधी कधी पू. आजींच्या तोंडातून आवाज येतो. नामजप केल्यानंतर आवाज आपोआप न्यून होतो.

१३ ई. एका साधकाला पू. आजींच्या खोलीचा आकार वाढल्याचे जाणवणे
डॉ. नरेंद्र दाते : एक साधक येथे आले होते. त्यांना खोलीचा आकार वाढल्याचे जाणवले. त्यांना नामजप करतांना आनंदही मिळत होता.
१३ उ. साधकांना शिकायला मिळावे; म्हणून पू. आजी मरणप्राय यातना सोसून जिवंत राहिलेल्या असणे
सौ. ज्योती दाते : प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘‘पहिल्या दिवशी जेव्हा त्यांना पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक) झाला, त्याच दिवशी त्यांचा महामृत्यूयोग होता. त्या उपायांमुळे जिवंत आहेत. आताही त्यांना आतून मृत्यूसारख्याच वेदना होत आहेत; पण ‘आम्हाला शिकायला मिळावे’, यासाठी त्या जिवंत आहेत. ‘त्यांची स्थिती कशी आहे ?’, हे आपल्याला कळत नाही; पण आपल्यासाठी त्या सर्व सहन करत आहेत.’’
१३ ऊ. पू. आजींसाठी उपाय करतांना गुरुकृपेने सूक्ष्मातील अनेक बारकावे शिकता येणे

श्री. निरंजन दाते (पू. आजींचा धाकटा मुलगा) : आम्ही पू. आजींच्या शरिराच्या वेगवेगळ्या अवयवांवर, उदा. पोट, छाती, गळा, कान, नाक इत्यादी भागांवर उपाय केल्यावर त्यांवर झालेले परिणाम पाहिले. वेगवेगळे उपाय करतांना आम्ही जेव्हा न्यास करत होतो, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना जाणवायच्या. ऊर्जेचा प्रवाह येत असल्याचे जाणवायचे. मनालाही शांतही वाटत होते. त्या संवेदना अशा होत्या की, त्यामुळे माझी बोटेही आपोआप हलायची. प्रारंभी सांगितल्यानुसार हातांनी पूर्ण देहासाठी उपाय केल्यावर ऊर्जा अधिक जाणवत होती. ‘बोटे आणि मनगट यांपैकी कुठे अधिक शक्ती जाणवते ?’, याचा अभ्यास केल्यावर ‘मनगटात अधिक शक्ती आहे’, असे लक्षात आले. अशा प्रकारे आम्हाला सूक्ष्माविषयी जे शिकायला मिळाले, त्यातून आम्हाला पुष्कळ आनंद झाला. पूर्वी आपण सप्तचक्रांवर न्यास करून उपाय करत होतो. आता शरिरावरील कोणत्याही बिंदूच्या ठिकाणी अडथळा असल्यास तो लक्षात येतो. ‘त्यानुसार कोणता जप करायचा आहे ?’, हे शोधता येते आणि तो जप केला, तर पुष्कळ परिणामकारक होतो.
सौ. नेहा दाते (पू. आजींची धाकटी सून) : गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे ‘पू. आजींसाठी नामजपादी उपाय शोधतांना उष्णता अनुभवयाला येते का ?’, याचा अभ्यास केल्यावर आणि लक्षपूर्वक उपाय केल्यावर त्या त्या भागात उष्णता जाणवत होती. ज्या वेळी उष्णता जाणवली, तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘आता उष्णता आहे, तर आपण ‘थंड’, या शब्दाचा जप करून पाहूया.’’ तेव्हा मला हे शिकायला मिळाले.

१३ ए. ‘वैद्यकशास्त्रानुसार केलेले उपाय आणि मानसिक स्तरावरील उपाय’, यांपेक्षा आध्यात्मिक स्तरावरील उपाय श्रेष्ठ आहेत’, हे शिकायला मिळणे
श्री. निरंजन दाते : १५ दिवसांपूर्वी पू. आजींची स्थिती फार नाजूक आणि गंभीर होती. त्या वेळी त्या बेशुद्धावस्थेत होत्या. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगितले. मला या उपायांतून शिकायला मिळाले, ‘वैद्यकीय शास्त्रानुसार केलेले उपाय आणि मानसिक स्तरावरील उपाय’, यांपेक्षा आध्यात्मिक स्तरावरील उपाय पुष्कळ श्रेष्ठ आहेत. येणार्या आपत्काळात आपल्याला याचा पुष्कळ लाभ होईल.’ (क्रमशः)
|
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !