
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी देशहितासाठी अनेक देशांच्या उत्पादनांवर आयात शुल्क लादले; मात्र आता त्याचा विपरीत परिणाम दिसत असून या धोरणाचा अमेरिकेला फटका बसत आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका तथा अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे. ‘अमेरिकेने विविध देशांवर आयात शुल्क लादून ६ महिने झाले. आयात शुल्कामुळे जागतिक स्तरावर व्यापार युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील देशांवर आयात शुल्क लादून अमेरिकेने काय साध्य केले ?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
📉 Gita Gopinath Slams Trump’s Tariffs
Harvard Prof & ex-IMF Chief Economist Gita Gopinath gives a “negative scorecard” for Trump-era tariffs 👇
1️⃣ Revenue up — but paid by US firms & consumers (like a tax)
2️⃣ Inflation up — esp. for appliances, furniture, coffee
3️⃣ No… pic.twitter.com/wjhjmKisti
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 8, 2025
गीता गोपीनाथ पुढे म्हणाल्या,
१. आयात शुल्क लादल्यामुळे अमेरिकेचा काही प्रमाणात महसूल वाढला आहे; मात्र तो अमेरिकी आस्थापनांकडून गोळा केला गेला आहे.
२. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि व्यापार संतुलन सुधारण्यासाठी आयात शुल्क धोरण राबवण्यात आले; परंतु व्यापार संतुलनात सुधारणा किंवा अमेरिकी उत्पादन क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
३. सरकारच्या या धोरणामुळे देशात महागाई वाढली आहे. घरगुती उपकरणे, फर्निचर आणि कॉफी यांसारख्या गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !