
इस्लामाबाद (पाकिस्तान) – अफगाणिस्तानच्या सीमेजवळ पाकिस्तानी सैन्याच्या वाहनवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात ९ सैनिक आणि २ अधिकारी ठार झाले. वायव्य कुर्रम जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला बाँबस्फोट झाले आणि त्यानंतर मोठ्या संख्येने आतंकवाद्यांनी गोळीबार केला. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. दुसरीकडे ओरकझाई जिल्ह्यात लपलेल्या १९ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, अशी माहिती पाकच्या सैन्याने दिली.
💥 TTP strikes back in Pakistan
At least 11 Pakistani soldiers were killed and 2 injured in an overnight attack by Tehrik-i-Taliban Pakistan (TTP) militants in Khyber Pakhtunkhwa.
When terrorists trained in Pakistan attack India, Islamabad celebrates.
But Pakistan should… pic.twitter.com/69yOjcZdlB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 9, 2025
गेल्या काही महिन्यांत टीटीपीने पाकमधील सुरक्षा दलांवरील आक्रमणे वाढवली आहेत. ही संघटना पाकिस्तानी सरकार उलथवून तेथे इस्लामी राजवट स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. (पाकमध्ये इस्लामी राजवट अस्तित्वात असतांनाही आणखी कोणती इस्लामी राजवट लावण्यासाठी आतंकवादी प्रयत्न करत आहेत ?, असा प्रश्न हिंदूंना पडल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
पाकचे म्हणणे आहे की, आतंकवादी अफगाणिस्तानात प्रशिक्षण घेतात आणि पाकवर आक्रमण करतात. (पाकमध्ये प्रशिक्षण घेणारे आतंकवादी भारतावर आक्रमण करतात, तेव्हा पाकला आनंद वाटत असतो. ‘जे पेरले जाते, तेच उगवते’, हे पाकने लक्षात घ्यावे ! – संपादक)
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan