
मुंबई – राज्यात झालेल्या अतीवृष्टीच्या हानीभरपाईसाठी सरकारने ३१ सहस्र ६२८ रुपयांचे विशेष अर्थसाहाय्य घोषित केले आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ७ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची घोषणा केली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. हे अर्थसाहाय्य दिवाळीच्या पूर्वी शेतकर्यांच्या अधिकोषाच्या खात्यांमध्ये जमा होईल, असे आश्वासनही या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्रशासनाच्या निकषांनुसार २ हेक्टरपर्यंत आर्थिक साहाय्य देता येते; परंतु राज्यशासनाने ३ हेक्टरपर्यंत अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक अर्थसाहाय्य आहे.
शेतकर्यांना तात्काळ पैसे देणे चालू करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ या जिल्ह्यांत ५० टक्के हानी, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक हानी, तर सोलापूर अन् धाराशिव येथे ८० टक्क्यांहून अधिक हानी झाली आहे. अतीवृष्टीमध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना यापूर्वीच आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. पीकहानीसाठी साधारण १८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक निधी देण्यात येणार आहे. पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी काहींनी मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाकडे निधी दिला आहे. काहींनी ‘सी.एस्.आर्’ (सामाजिक बांधिलकी निधी) देण्याचे मान्य केले आहे. शेतकर्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार नाही, या दृष्टीने शासनाकडून अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

असे असेल अर्थसाहाय्य !
अतीवृष्टीमुळे भूमीचा कस वाहून गेलेल्या शेतकर्यांना प्रतिहेक्टरी हेक्टरी ३ लाख ४७ सहस्र रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. दुधाळ जनावरांकरता ३७ सहस्र रुपये, गाळाने भरलेल्या विहिरींसाठी ३० सहस्र रुपये, कुकुटपालनाला प्रतीकोंबडी १०० रुपये, डोंगरी भागातील घरासाठी १० सहस्र रुपये, झोपडी, तसेच गोठा अणि दुकान यांसाठी ५० सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. शेतकर्यांना रबीचे पीक घेता आले पाहिजे, यासाठी प्रतीहेक्टरी १० सहस्र रुपये, हंगामी बागायती शेतीसाठी प्रती हेक्टरी २७ सहस्र रुपये, बागायती शेतीकरता प्रतीहेक्टरी ३२ सहस्र रुपये, विमा नसलेल्या शेतकर्यांना हेक्टरी १७ सहस्र रुपये, कोरडवाहू शेतकर्यांना प्रतीहेक्टरी ३५ सहस्र रुपये, विमा उतरवलेल्या बागायती शेतीसाठी प्रतीहेक्टरी ५० सहस्र रुपये अशा प्रकारे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
शेतकर्यांमागे कायमच खंबीरपणे उभे राहू ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अतीवृष्टीमुळे राज्यातील ३५२ तालुके आणि ६२ लाख हेक्टर भूमी बाधित झाली आहे. ७ लाख शेतकरी बाधित झाले आहेत. या संकटकाळात शेतकर्यांना आधाराची आवश्यकता आहे. शेतकर्यांच्या मागे आम्ही कायमच खंबीरपणे उभे राहू.
काही राहून गेले असेल, तर समावेश करू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
अर्थसाहाय्य करतांना कोणताही घटक वंचित रहाणार नाही, याचा विचार करण्यात आला आहे. निकष काही असले, तरी भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. साहाय्य करण्यात काही राहून गेले असल्यास त्याचा समावेश करण्याचीही आमची सिद्धता आहे.
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !