खंडाळा येथे शस्त्रपूजनासह पथसंचलन उत्साहात !

खंडाळा (छत्रपती संभाजीनगर) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी झाली आहे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरला बेटाचे पीठाधीश्वर महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांनी येथे केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आणि विजयादशमीचा उत्सव, यांनिमित्त वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे ‘आनंद प्रज्ञा इंग्लिश स्कूल’च्या परिसरात ४ ऑक्टोबर या दिवशी शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमापूर्वी संपूर्ण गावातून संघाचे पथसंचलन झाले. त्यानंतर महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले. या वेळी संघाचे प्रांत प्रचारक स्वप्नील चांदणीकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज पुढे म्हणाले,
‘‘संघ ही जगातील सर्वांत मोठी संघटना आहे. ती केवळ टिकली नाही, तर तिची वाढही झाली. सनातन संस्कृतीत दया आहे. अन्यायाचा प्रतिकार करणे, हा क्षत्रिय धर्म आहे. जो अन्याय करतो, त्याहून तो सहन करणारा अधिक दोषी असतो. प्रत्येकाला स्वरक्षणाचा अधिकार आहे. तो अधिकार राज्यघटनेने दिला आहे. आपल्या भक्तीच्या आड येणार्या आणि अन्यायाच्या मार्गाने जाणार्या व्यक्तींचा त्याग करावा. ती व्यक्ती जवळची असो वा घरातील, तिचा त्याग करावा.’’
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !