MP Madrasa Conversion : मध्यप्रदेशातील २७ मदरशांतून ५५६ हिंदु मुलांना शिकवले जात आहे कुराण  !

  • हिंदु मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न

  • राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने शिक्षण विभागाच्या प्रमुख सचिवांकडे मागितले उत्तर !

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियंक कानूनगो (डावीकडे)

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील २७ मदरशांमध्ये हिंदु मुलांचे बेकायदेशीर धर्मांतर चालू आहे. ५५६ हिंदु मुलांना इस्लाम स्वीकारण्यासाठी लक्ष्य केले जात असल्याची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली आहे. आयोगाने या प्रकरणाची नोंद घेत शिक्षण विभागाच्या प्रमुख सचिवांकडून १५ दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे. तसेच या संदर्भात गुन्हा नोंदवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की,

मुरैना, इस्लामपुरा, जौरा आणि इतर भागांतील हे मदरसे ‘किशोर न्याय अधिनियम २०१५’चे उल्लंघन करत आहेत. आयोगाने या पत्रात विचारले आहे की, मदरसे शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या चौकटीत नसतांनाही हिंदु मुलांना प्रवेश का दिला जात आहे ? तसेच या मदरशांवर बेकायदेशीर परदेशी निधी मिळवण्याचा आणि राष्ट्रविरोधी घटकांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मदरसे शिक्षण केंद्र नसल्याने राज्य सरकारांनी मदरशांना दिली जाणारी अनुदाने तात्काळ थांबवावी !

आयोगाचे सदस्य प्रियंक कानूनगो यांनी सांगितले की, मदरसे हे शिक्षण केंद्र नसून धार्मिक परंपरा शिकवण्याची ठिकाणे आहेत. हिंदु मुलांना कुराण शिकवले जाण्याची समस्या अनेक वर्षांपासून चालू आहे. राज्य सरकारांनी मदरशांना दिली जाणारी अनुदाने तात्काळ थांबवावी; कारण ते सरकारचे काम नाही. आयोग आता या प्रकरणात कठोर कारवाई करण्याच्या सिद्धतेत आहे.

संपादकीय भूमिका

  • मदरशांमधून कुराण शिकवले जाते, हे ठाऊक असतांना हिंदु पालक त्यांच्या मुलांना तेथे पाठवतातच कसे ? यातून हिंदूंमध्ये किती जागृती करण्याची आणि त्यांना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात येते !
  • मदरशांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास कायद्याद्वारे बंदी असतांनाही अशा प्रकारे त्यांना प्रवेश देणार्‍यांना कारागृहात डांबले पाहिजे !