सांगली येथील श्री दुर्गामाता दौडीच्या निमित्ताने…

सांगली, ३० सप्टेंबर (वार्ता.) – पतीनिष्ठा, मातृ-पितृनिष्ठा, देवनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, राजनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि समाजनिष्ठा धारण करणारा नीतिमान हिंदु समाज हाच खरा हिंदवी स्वराज्याचा पाया होता. त्या काळी पतिव्रता स्त्री स्वत:च्या यजमानाच्या मृत्यूनंतर चितेत उडी मारून समर्पण करत असे. अशा प्रकारची पतिनिष्ठा त्या काळी होती. या सर्व प्रकारच्या निष्ठा हाच आपल्या समाजाचा प्राण आहे. अशा प्रकारची निष्ठा निर्माण करण्यात छत्रपती शिवराय यशस्वी ठरले; म्हणूनच हिंदवी स्वराज्य हे पथदीपक ठरले; परंतु ब्रिटिशांच्या काळात फितूर झालेले तथाकथित सुशिक्षित आणि सुधारणावादी यांनी सुधारणा अन् आधुनिकता यांच्या नावाखाली पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीचा उदोउदो केला. हिंदु समाजातील या सर्व निष्ठा हेतूपुरस्सर आणि जाणीवपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नीतीमान हिंदु समाजाच्या मनामध्ये विष कालवले आहे, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी २९ सप्टेंबर या दिवशी येथे केले.
पू. भिडेगुरुजी म्हणाले की, निष्ठावान आणि नीतिमान हिंदु समाज पुनरुजीवित झाल्यास तो हिंदवी स्वराज्य पुन्हा एकदा घडवू शकतो. मातृ-पितृनिष्ठ, समाजनिष्ठ, धर्मनिष्ठ, देवनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ आणि राजनिष्ठ असा नितीमान हिंदु समाज निर्माण करण्यासाठी आपण शक्ती, बुद्धी अन् प्रेरणा श्री दुर्गामातेच्या चरणी मागूया.
| मराठवाड्यातील पूरग्रस्तांना सढळ हातांनी साहाय्य करूया ! – पू. भिडेगुरुजी
‘गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सगळीकडेच आणि विशेषत: मराठवाड्यात अतीवृष्टी झाली आहे. या पावसामुळे अनेक शेतकर्यांचे, गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले. याची जाण ठेवून आपण सर्वांनी या पूरग्रस्तांना सढळ हातांनी साहाय्य करूया’, असे आवाहन पू. भिडेगुरुजी यांनी सर्व धारकर्यांना केले. |
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !