हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा तीव्र विरोध !

मिसिसॉगा (कॅनडा) – शहरात दिवाळीच्या वेळी फटाक्यांवर बंदीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यास तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हटले की, हा निर्णय केवळ कॅनडामधील हिंदूंना लक्ष्य करतो आणि त्यामुळे दिवाळीच्या सांस्कृतिक परंपरांचा थेट नाश होईल. ‘हिंदु कॅनेडियन फाऊंडेशन’ आणि उत्तर अमेरिकेतील हिंदूंची संघटना, म्हणजेच ‘कोहना’ (कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका) या संघटनांनी शहराच्या महापौर कॅरोलिन पैरिश यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, फटाक्यांवर बंदी लावण्याचे कारण स्पष्ट नाही आणि हा निर्णय हिंदु संस्कृतीवर थेट आक्रमण आहे. एक लहान परंतु संघटित असलेला गट जाणूनबुजून हिंदूंच्या सणांच्या विरोधात कुप्रचार करून तक्रारी करत आहे. (विदेशातील किती हिंदू हिंदु विरोधकांप्रमाणे सुसमन्वय ठेवून स्वत:वरील आघातांना परतवून लावण्यासाठी सतर्कतेने कार्य करतात ? – संपादक) याचा वापर शांततेने सण साजरे करणार्या सहस्रावधी लोकांना रोखण्यासाठी केला जात आहे. संघटनांनी म्हटले की, आता आपला धर्म, संस्कृती आणि आपल्या मुलांना आपली समृद्ध परंपरा जोपासता यावी, यासाठी उभे रहाण्याची ही वेळ आहे.
‘हिंदु कॅनेडियन फाऊंडेशन’ आणि ‘कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संघटनांनी १ ऑक्टोबरला हिंदूंना या प्रस्तावाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ‘मिसिसॉगा सिटी हॉल’मध्ये आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !