अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

सावंतवाडी – सिंधुदुर्गनगरी येथे खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका महिला अधिकार्याचा मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येत्या ४ दिवसांत खड्डे भरा, अन्यथा प्रशासनाला जाग आणण्यासाठी खड्ड्यात बसून आंदोलन करणार, अशी चेतावणी ‘सामाजिक बांधिलकी’ संघटनेचे पदाधिकारी रवि जाधव यांनी दिली आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील ‘डॉन बॉस्को स्कूल’ समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे २३ सप्टेंबरला दुपारी दुचाकीचा अपघात होऊन जिल्हा परिषद लेखा आणि कोषागार कार्यालयाच्या साहाय्यक लेखाधिकारी श्रीमती हेमलता धोंडू कुडाळकर (रहाणार कुडाळ) यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाधव यांनी म्हटले आहे की, ‘गेली अनेक वर्षे खड्डयांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे; मात्र खासदार, आमदार आणि पालकमंत्री यांना कोणतेही सुवेरसुतक नाही. येत्या ४ दिवसांत खड्डे भरा आणि जमत नसेल, तर आम्हाला तसे लेखी द्या. आम्ही याविषयी योग्य तो विचार करू.’
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !