
कोपरगाव – येथे तळेगाव मळे (जिल्हा नगर) येथील श्री महेंद्र टुपके महाराज यांची भेट सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी घेतली. या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी त्यांचा हार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. या वेळी श्री महेंद्र टुपके महाराज यांनी गोरक्षणाचे कार्य आणि अध्यात्माचा प्रसार करतांना त्यांना आलेले चांगले अन् कटू अनुभव सांगितले, तसेच त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन सद्गुरु जाधव यांच्याकडून करून घेतले. त्यांचा सद्गुरु जाधव यांना भेटल्यानंतर भाव जागृत झाला होता.
संत महेंद्र टुपके महाराज यांचे कार्य
१. कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन विकत घ्यावा लागला, हे लक्षात घेऊन निसर्गाचे संतुलन रहावे, यासाठी त्यांनी ६ सहस्रांहून अधिक झाडे लावण्यासाठी रोपांचे वाटप केले आहे. ‘फळांची झाडे कुणी तोडत नाही’, हा उद्देश ठेवून त्यांनी अधिक प्रमाणात फळांच्या झाडांच्या रोपांचे वाटप केले आहे. त्यातील ५ सहस्र झाडे जिवंत आहेत.
२. कातड्याच्या वस्तू जनावरांची हत्या करून निर्माण केल्या जातात, हे लक्षात घेऊन मंदिरामध्ये कुणी कातड्याच्या वस्तू आणल्यास त्यांना दर्शन घेण्यासाठी ते आतमध्ये सोडत नाहीत. याचा परिणाम अनेक जणांनी कातड्याच्या वस्तू वापरण्याचे प्रमाण अल्प केले आहे.
संत महेंद्र टुपके महाराज यांचा भाव आणि अहंशून्यता !संत महेंद्र टुपके महाराज हे सद्गुरु जाधवकाकांशी बोलतांना ‘मी एक सामान्य व्यक्ती आहे, तुमच्यासारखे सद्गुरु आम्हाला भेटले हे आमचे भाग्य आहे, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा’, असे सांगत होते. त्यांचे धर्मप्रसाराचे कार्य पुष्कळ प्रमाणात आहे, असे असूनही त्यांच्या वागण्यात किंवा बोलण्यात कुठेही अहंभाव जाणवत नव्हता. |
संत महेंद्र टुपके महाराज यांचा परिचय
संत महेंद्र टुपके महाराज यांचे तळेगाव मळे येथे श्री दत्त मंदिर आहे. येथे हिंदु धर्मातील जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा करणे, गुरुचरित्राचे पारायण करणे, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे, दिवाळीमध्ये आता असलेल्या आणि पूर्वी असलेल्या सैनिकांच्या वडिलांचा सत्कार करणे, असे उपक्रम ते राबवतात. प्रत्येक शनिवारी आणि गुरुवारी प्रश्नोत्तरे असतात. वर्ष २०२६ च्या गणेशोत्सवामध्ये ते ३० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विनामूल्य वाटप करणार आहेत. त्याची सिद्धता त्यांनी चालू केलेली आहे. गोशाळेचे बांधकाम चालू आहे.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !