‘प्रतिवर्षी पितृपक्षात देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सामूहिक श्राद्धविधी करतात; पण ‘या वर्षी श्राद्धविधी न करता केवळ सर्व साधकांच्या पितरांसाठी प्रतिदिन अन्न ठेवले जाणार आहे. साधकांनी त्या वेळेत प्रार्थना करावी’, अशी सूचना फलकावर लिहिली होती. ती वाचून माझ्या मनाला खंत वाटली. त्या वेळी माझ्या मनात ‘या वर्षी आपल्याकडून हे विधी होणार नाहीत’, हेच विचार सतत येत होते. ९.९.२०२५ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या गाडीजवळ बसून मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होतो. त्या वेळी मला दिसलेले दृश्य आणि आलेली अनुभूती येथे दिली आहे.

१. प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या गाडीजवळ बसून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत असतांना दिसलेली दृश्ये
अ. मी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या गाडीजवळ नामजप करत असतांना ‘माझे सर्व पितर प.पू. बाबांच्या गाडीजवळ येऊन उभे आहेत’, असे दृश्य मला दिसले. तेव्हा मी त्यांना भावपूर्ण नमस्कार केला.
आ. त्यानंतर माझे पितर म्हणजे ‘माझे पणजोबा, आजोबा, आजी, आईची आई, मावशी असे एका पाठोपाठ एक जण येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद देऊन पुढे जात आहेत’, असे दृश्य मला दिसले.
इ. माझे काही अपघाती निधन झालेले जवळचे मित्रही मला दिसले. मला त्यांचा चेहरा पुष्कळ दुःखी जाणवत होता. मी त्यांना आश्वस्त करत सांगितले, ‘काळजी करू नका. तुम्ही येथपर्यंत आला आहात, तर माझे गुरु तुम्हालाही निश्चितच मार्ग दाखवतील. तुम्ही सनातनच्या काही लिंगदेहांच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ करा, म्हणजे तुम्हीसुद्धा लवकर पुढच्या गतीला जाल.’

२. अनुभूती
२ अ. ही सर्व दृश्ये पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटू लागली.
२ आ. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ !’ याची प्रचीती येणे : प्रत्येक वर्षी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांची गाडी असते, त्या ठिकाणी आमच्याकडून सामूहिक श्राद्धविधी केले जात होते. या वर्षी श्राद्धविधी न करताही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पितरांचे आशीर्वाद मिळाल्याची अनुभूती आली. तेव्हा गुरुदेवांनी ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ !’ याची मला प्रचीतीच दिली. याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अमित अशोक हावळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.९.२०२५)
|
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !