‘एकदा मी एका साधिकेशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी मला वर्ष २००० मध्ये त्यांना आलेली एक अनुभूती सांगितली. त्या अनुभूतीनंतर त्या सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागल्या. ती अनुभूती त्या साधिकेच्याच शब्दांत पुढे दिली आहे.

१. साधिकेच्या नातेवाईकाचे आकस्मिक निधन होणे, मृत्यूनंतर ती व्यक्ती सतत दिसल्यामुळे भीती वाटून साधिका कित्येक रात्र झोपू न शकणे
साधिकेने मला सांगितले, ‘‘माझ्या एका नातेवाईकाचे आकस्मिक निधन झाले. निधनानंतर मला ती मृत व्यक्ती सतत दिसू लागली. त्यामुळे मी पुष्कळ अस्वस्थ असायचे. त्या व्यक्तीचे डोळे घारे होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी ती दिसल्यावर मला पुष्कळ भीती वाटायची आणि भीतीमुळे मला कित्येक रात्री झोप लागायची नाही. आश्चर्य म्हणजे, आमच्या घरातील अन्य सदस्यांना मात्र ती कधी दिसायची नाही आणि केवळ मलाच दिसायची.’’
२. एका साधकाने सांगितल्याप्रमाणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर रात्री शांत झोप लागणे अन् तेव्हापासून मृत नातेवाईक दिसणे बंद होणे

त्या कालावधीत आमच्याकडे ‘सनातन प्रभात’ हे साप्ताहिक येत होते. मला त्यातील लिखाण वाचायला पुष्कळ आवडायचे. एकदा साधक साप्ताहिक देण्यासाठी आला. तेव्हा मी त्याच्याकडून साप्ताहिकातील लिखाणाविषयी जाणून घेतले. त्याने मला ‘सनातन संस्था’ आणि ‘आपल्या जीवनातील साधनेचे महत्त्व’ यांविषयी सांगितले. साधनेला आरंभ करायचा असल्यास प्रथम कुलदेवतेचा नामजप आणि पूर्वजांच्या त्रासाच्या निवारणासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगितले.
मी लगेचच कुलदेवतेचा नामजप करायला आरंभ केला. त्या दिवशी झोपण्यापूर्वी मी थोडा वेळ ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला. तेव्हा मला ‘कधी झोप लागली’, हे कळलेच नाही. जवळजवळ एका मासानंतर मला अशी चांगली झोप लागली होती. त्या दिवसानंतर मला माझी दिवंगत नातेवाईक व्यक्ती पुन्हा कधीच दिसली नाही. मला याचे पुष्कळ आश्चर्य वाटले. मी ते दोन्ही नामजप करणे चालूच ठेवले.
३. मुलीच्या स्वप्नात मृत नातेवाईकाने येऊन ‘तुझी आई नामजप करत असल्याने मला तिच्याकडे जाता येत नाही’, असे सांगणे
‘३ – ४ दिवसांनंतर माझ्या मुलीने मला दूरभाष करून सांगितले, ‘आई, ती मृत नातेवाईक व्यक्ती काल माझ्या स्वप्नात आली होती. मी तिला स्वप्नात येण्यामागचे कारण विचारल्यावर ती म्हणाली, ‘तुझी आई काहीतरी (नामजप) करते; म्हणून मला तिच्याकडे आता जाता येत नाही.’
मी केवळ थोडाच वेळ ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यामुळे एवढा मोठा परिणाम झाला. हे पाहून मी थक्क झाले. त्यानंतर मी नामजप मनोभावे करू लागले आणि सनातन संस्थेने सांगितल्यानुसार साधनेला आरंभ केला.’’
साधिकेच्या या अनुभूतीवरून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचे महत्त्व किती आहे ?’, याची मला पुन्हा एकदा जाणीव झाली आणि हा नामजप करायला सांगणार्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली.’
– सौ. विजयलक्ष्मी आमाती, फोंडा, गोवा. (२८.८.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !