
मुंबई – मागील काही दिवसांपासून पशूवधगृहात हत्येसाठी नेण्यात येणार्या गायींच्या रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गोरक्षक यांचा कुरेशी कसायांशी संघर्ष झाल्याच्या घटना घडत आहेत. गोरक्षक स्वत:च्या जिवावर उदार होऊन गायींचे रक्षण करत आहेत. गायींचे रक्षण होत असल्यामुळे कुरेशी कसायांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून गोरक्षकांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र कुरेशी कसायांनी चालू केले आहे, असा गंभीर आरोप महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला.
१७ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात शेतकरी आणि समस्त गोरक्षक हिंदु समाज यांच्या वतीने महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज आणि पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका व्यक्त केली. विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. मोहन सालेकर हे उपस्थित होते.
राजकारणासाठी गोमातेचा उपयोग करू नका ! – पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीकाही लोक सुपारी घेतल्याप्रमाणे गोरक्षकांविषयी अपप्रचार करत आहेत. हे लोक शेतकर्यांच्या आडून गोरक्षकांना लक्ष्य करत आहेत. यामागे कुरेशी कसायांच्या संघटनेचा हात आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात १ सहस्र ८० गोशाळा आहेत. हे गोशाळा संचालक प्रसंगी पदरमोड करून गोवंशियांचा सांभाळ करत आहेत. गोमाता हा धार्मिक विषय आहे. राजकारण्यांनी गोमातेचा उपयोग राजकारणासाठी करू नये. |
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari