दिनांक १३.९.२०२५ या दिवशीच्या अंकात आपण दीक्षा देण्याचे आध्यात्मिक महत्त्व आक्षि दीक्षेचे प्रकार (उदा. पारंपरित दीक्षा, शब्ददीक्षा, मंत्रदीक्षा इत्यादी) जाणून घेतले. आज त्यापुढील भाग जाणून घेऊया.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/956129.html

२ ई. विविध योगमार्गांनुसार दिलेली दीक्षा
२ ई १. शक्तीपातयोगानुसार दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला शक्तीपातयोगानुसार दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘शक्तीपातयोगानुसार दीक्षा’, असे म्हणतात.

२ ई १ अ. गुरु शिव आणि शिष्य पार्वती : शिव-पार्वती यांच्या विवाहानंतर शिवाने पार्वतीला शक्तीपातयोगाची दीक्षा देत तिच्या कपाळावर भस्म लावून तिला मुंडमाळा (कवट्यांची माळ) धारण करण्यास सांगितले अन् तिला शिष्यरूपात स्वीकारले. त्यानंतर शिवाने तिला शक्ती किंवा देवी तंत्र आणि भैरव तंत्र यांचे ज्ञान दिले.
२ ई २. शक्तीपातयोगांतर्गत कर्मकांडानुसार दीक्षा : जेव्हा गुरु शक्तीपातयोगांतर्गत कर्मकांडाचा समावेश करून शिष्याला दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘शक्तीपातयोगांतर्गत कर्मकांडानुसार दीक्षा’, म्हणतात.
२ ई २ अ. गुरु गोविंदभगवत्पूज्यपाद आणि शिष्य आद्य शंकराचार्य : गोविंदभगवत्पूज्यपाद यांनी ८ वर्षांच्या शंकराचार्यांना शक्तीपातयोगानुसार दीक्षा देऊन नंतर कर्मकांडानुसार भगवी वस्त्रे दिली आणि त्यांना हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी हाती धर्मदंडही दिला.

२ ई ३. तांत्रिक मार्गानुसार दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला तंत्रमार्गानुसार दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘तांत्रिक मार्गानुसार दीक्षा’, म्हणतात.
२ ई ३ अ. गुरु भानामती आणि शिष्य प्रद्युम्न : शंभरासुर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी शंभरासुराची दासी ‘भानामती’ हिने तिच्या तंत्रसिद्धीद्वारे बाळ प्रद्युम्नला काही क्षणांतच युवा केले. त्यानंतर ती त्याची गुरु बनली आणि तिने युवा प्रद्युम्नला तंत्रमार्गानुसार दीक्षा देऊन त्याला ‘शिष्य’ म्हणून स्वीकारले अन् त्याला मायावी विद्या शिकवून अनेक मायावी सिद्धी बहाल केल्या. त्यामुळे प्रद्युम्नने शंभरासुराशी युद्ध केले. तेव्हा त्याला शंभरासुराच्या सर्व सिद्धी निष्प्रभ करता आल्या आणि त्याचा वध करण्यात यश प्राप्त झाले.
२ ई ४. कर्मयोगानुसार दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला कर्मयोगानुसार दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘कर्मयोगानुसार दीक्षा’, म्हणतात.
२ ई ४ अ. गुरु भगवान श्रीकृष्ण आणि शिष्य विदुर अन् युधिष्ठिर : भगवान श्रीकृष्णाने विदुर आणि युधिष्ठिर यांना सूक्ष्मातून दीक्षा दिल्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येक कर्म धर्मशास्त्रानुसार होऊन ते आदर्श कर्मयोगी बनले.

२ ई ५. ध्यानयोगानुसार दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला ध्यानयोगानुसार दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘ध्यानयोगानुसार दीक्षा’ म्हणतात.
२ ई ५ अ. गुरु शुक्राचार्य आणि शिष्य देवगुरु बृहस्पतींचा पुत्र कच : जेव्हा देवगुरु बृहस्पतींचा पुत्र कच शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या शिकण्यासाठी येतो, तेव्हा शुक्राचार्य कचाची कठोर परीक्षा घेऊन त्याला ध्यान लावण्यास सांगून स्वतः ध्यान लावतात. त्यानंतर ते ध्यानयोगाच्या माध्यमातून कचाला दीक्षा देऊन त्याचा ‘शिष्य’ म्हणून स्वीकार करतात आणि त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला ‘संजीवनी विद्या’ देतात.
२ ई ६. ज्ञानयोगानुसार दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला ज्ञानयोगानुसार दीक्षा देतात, तेव्हा त्याला ‘ज्ञानयोगानुसार दीक्षा’ म्हणतात.
२ ई ६ अ. गुरु व्यासपुत्र शुकदेव आणि शिष्य राजा परीक्षित : शृंगी ऋषींनी दिलेल्या शापामुळे राजा परीक्षिताचा मृत्यू ७ दिवसांनी तक्षक नागाच्या दंशाने होणार असतो. या ७ दिवसांत मोक्षप्राप्ती करता यावी; म्हणून व्यासपुत्र ऋषि शुकदेव परीक्षिताला ज्ञानयोगाची दीक्षा देऊन त्याला भागवत पुराणातील कथा आणि ज्ञान सांगू लागतात. या ज्ञानामुळे परीक्षिताला आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि ७ व्या दिवशी त्याचा तक्षक नागाच्या दंशाने मृत्यू होतो; परंतु आत्मज्ञानामुळे त्याला मोक्षाची प्राप्ती होते.
२ ई ७. भक्तीयोगानुसार दीक्षेचे प्रकार
२ ई ७ अ. भक्तीयोगांतर्गत सूक्ष्मातून दीक्षा देणे : जेव्हा गुरु शिष्याला भक्तीयोगानुसार दीक्षा देतात, तेव्हा त्याला ‘भक्तीयोगानुसार दीक्षा’ म्हणतात.
२ ई ७ अ १. गुरु महर्षि व्यास आणि शिष्य संजय : महर्षि व्यास संजयच्या कृष्णभक्तीने प्रसन्न होतात. त्यामुळे ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने संजयवर कृपा करून एक प्रकारे त्याला सूक्ष्मातून भक्तीयोगानुसार दीक्षा देऊन त्याला दिव्यदृष्टी देतात. त्यामुळे हस्तिनापुराच्या राजमहालात बसून संजयला कुरुक्षेत्रावरील कौरव आणि पांडव यांचे महाभारत युद्ध सूक्ष्मातून सुस्पष्टपणे दिसू लागते अन् तो त्या युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला सांगू लागतो.

२ ई ७ आ. भक्तीयोगांतर्गत उपासनाकांडानुसार दीक्षा देणे : जेव्हा गुरु शिष्याला भक्तीयोगांतर्गत उपासनाकांडानुसार दीक्षा देतात, तेव्हा त्याला ‘भक्तीयोगांतर्गत उपासनाकांडानुसार दीक्षा’ म्हणतात.
२ ई ७ आ १. गुरु भगवान श्रीकृष्ण आणि शिष्य अर्जुन : जेव्हा महाभारताच्या युद्धासाठी कौरव सेना आणि पांडव सेना समोरासमोर येतात, तेव्हा अर्जुनाला विषाद (खेद) होऊन तो त्याचे गांडीव धनुष्य सोडून हताश होतो. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीतेचे ज्ञान देण्यासाठी उपासनाकांडानुसार अनुग्रह देऊन स्वतःचा ‘शिष्य’ म्हणून स्वीकार करतो. त्यामुळे अर्जुनाला ‘अपण स्वतः नर असून श्रीकृष्ण भगवान नारायण आहे’, याचा प्रथम श्रीकृष्णाकडून आणि त्यानंतर शिवाकडून बोध होतो. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मज्ञानासह ब्रह्मज्ञानही देतो.
२ उ. स्थूल किंवा सूक्ष्म स्तरांवरील दीक्षा
२ उ १. स्थूल स्तरावरील दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला स्थुलातून दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘स्थूल स्तरावरील दीक्षा’ म्हणतात.
२ उ १ अ. गुरु संत रईदास आणि शिष्य संत मीराबाई : संत मीराबाई जेव्हा संत रईदास यांना भेटली, तेव्हा त्यांनी तिला गुरुमंत्रासह स्थुलातून दीक्षा दिली. तसेच श्रीकृष्णाचे भजन गाण्यासाठी तिला ‘एकतारी’ हे वाद्यही दिले. अशा प्रकारे स्थुलातून संत मीरेला संत रईदास गुरुरूपात लाभले आणि श्री गुरुकृपेने तिची कृष्णभक्ती उत्तरोत्तर वाढत गेली.

२ उ २. सूक्ष्म स्तरांवरील दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला सूक्ष्मातून दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘सूक्ष्म स्तरावरील दीक्षा’ म्हणतात.
२ उ २ अ. गुरु श्रीगणेश आणि शिष्य भक्त बल्लाळ : श्रीगणेशाने भक्त बल्लाळाला सूक्ष्म स्तरावर दीक्षा देऊन त्याला ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा नामजप करण्यास सांगितला. त्यामुळे भक्त बल्लाळाचा कल मायेकडून अध्यात्माकडे वळला आणि त्याला गणेश-उपासनेचा लळा लागला.
२ ऊ. आध्यात्मिक पातळीनुसार दिलेली दीक्षा : जेव्हा गुरु साधकाची किंवा शिष्याची आध्यात्मिक पातळी पाहून त्याला दीक्षा देतात, तेव्हा त्यांना ‘आध्यात्मिक पातळीनुसार दिलेली दीक्षा’ म्हणतात.
२ ऊ १. साधकाला दिलेली दीक्षा (३० ते ४९ टक्के पातळीपर्यंतच्या व्यक्ती) : जेव्हा गुरु साधकाला दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘साधकाला दिलेली दीक्षा’ असे म्हणतात.
२ ऊ १ अ. गुरु संत गजानन महाराज आणि शिष्य, अनेक भक्त किंवा साधक : संत गजानन महाराज यांनी अनेक भक्तांना किंवा साधकांना ‘गण गण गणात बोते’, या नामजपाचे महत्त्व सांगून दीक्षा दिली. त्यांतील ज्या भक्तांनी किंवा साधकांनी मनोभावे नामजप केला, त्यांच्यावर श्री गुरूंची कृपा होऊन त्यांना संतपद प्राप्त झाले.

२ ऊ २. शिष्याला दिलेली दीक्षा (५० ते ६९ टक्के पातळीपर्यंतच्या व्यक्ती) : जेव्हा गुरु शिष्याला दीक्षा देतात, तेव्हा त्याला ‘शिष्याला दिलेली दीक्षा’ असे म्हणतात.
२ ऊ २ अ. गुरु संत नरहरि दास आणि शिष्य संत तुलसीदास : तुलसीदासांना त्यांचे गुरु संत नरहरि दास यांनी रामनामाचा जप सांगून दीक्षा दिली आणि तुलसीदासांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यामुळे पुढे गोस्वामी तुलसीदास संत झाले, तसेच त्यांच्यावर रामनाम प्रिय असणारा हनुमान आणि शिव या देवतांची कृपा झाली. संत तुलसीदासांना प्रभु श्रीरामाचे दर्शन होण्यासाठी हनुमानाने आशीर्वाद दिला. त्यामुळे संत तुलसीदासांना प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्याचप्रमाणे संत तुलसीदासांना काशी विश्वनाथाने प्रत्यक्ष प्रगट होऊन दर्शन दिले आणि वाल्मीकि ऋषींच्या संस्कृतमधील रामायणाचा हिंदी भाषेमध्ये अनुवाद लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे संत तुलसीदासांनी ‘श्रीरामचरित मानस’ या अलौकिक ग्रंथाची निर्मिती केली.
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १८.९.२०२४)
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/957424.html
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !