पश्चिमेच्या देशात एकेकाळी रविवार, म्हणजे ‘चर्चचा दिवस’. बूट पॉलिश, हॅट (टोपी) नीट, बायबल हातात आणि घंटेच्या आवाजावर पावले चर्चच्या दिशेने वळायची. आत पाद्री (फादर) उभे. वर येशू. खाली पापी. मध्ये प्रार्थना.
आज ? घंटा आहे. चर्च आहे. आत येशू आहे. पापीही आहेत; पण चर्चच्या ‘आत’ नाहीत. त्यामुळे तिथे ‘फादर’ नाहीत. ओस पडलेले चर्च ‘कन्फेशन’ची (स्वीकृती / कबुलीजबाब) वाट पहात उभे आहे, भाविक नाहीत. येतच नाहीत, मग चर्चचे करायचे काय ? तर त्याला नाव दिले, ‘रिडंडंट’, म्हणजे ‘आवश्यकता संपली.’
गंमत बघा, ज्या राष्ट्रांनी नौका भरून धर्मप्रसारक पाठवले, आफ्रिकेपासून आशियापर्यंत बायबल आणि तलवार / बंदूक हातात घेऊन ‘आमचा देव खरा’ असे म्हणून जग पालटायला निघाले, आज त्यांच्या देशात चर्च ओस पडत आहेत. पेरले होते जगभर, उगवले नाही स्वतःच्या दारात ! काळ हिशोब ठेवतो ? व्याजासह वसूल करतो ?

१. अमेरिका
बंद चर्चचा ‘रिअल इस्टेट’ (स्थावर मालमत्ता) झाला. प्रतिवर्षी ४ सहस्र ५०० चर्च बंद. नवीन ३ सहस्र होतात. बाकी १ सहस्र ५०० ‘लॉस’. पुढल्या १० वर्षांत १ लाख चर्च बंद पडतील, असे म्हणतात. खरे-खोटे ठाऊक नाही; पण आकडा ऐकून पाद्रीसुद्धा ‘ओ माय गॉड’ (अरे माझ्या देवा) म्हणेल.
वर्ष २००७ ला ७८ टक्के ‘आम्ही ख्रिस्ती’. आज ६२ टक्के. उरलेले २८ टक्के ‘नथिंग’ (क्षुल्लक), म्हणजे ‘देव आहे का ?’, असे विचारले, तर ‘डोन्ट नो, डोन्ट केअर’ (मला माहिती नाही, काही देणे-घेणे नाही). मग चर्चचे काय ? सरकार पैसे देत नाही. विका. मग तिथे ‘ब्रूअरी’ (बिअरचा कारखाना) निघते. ‘होली वॉटर’ची जागा ‘xxx’ने घेतली. ‘कन्फेशन रूम’चे ‘स्टुडिओ अपार्टमेंट’ झाले. जिथे पापे मान्य केली जायची, तिथे आता भाडेकरू भांडतात ?
२. इंग्लंड

‘रिडंडंट’ म्हणजे सरकारी मृत्यू दाखला ? इंग्लंडमध्ये ‘रिडंडंट चर्च’ हा कायद्याचा शब्द. वर्षाला २०-२५ बंद पडतात. वर्ष १९६० पासून २ सहस्र बंद, ९५९ ‘हेरिटेज ॲट रिस्क’ (वारसा धोक्यात), म्हणजे पडतील; पण पाडू देणार नाही; कारण तो ‘इतिहास’ आहे. देवाचा नाही, दगडांचा. गेल्या १० वर्षांत ३ सहस्र ५०० बंद पडली म्हणतात; पण इंग्रजांनी वर्ष १९६९ पासून केवळ २० टक्के चर्चच्या इमारती पाडल्या. बाकीचे ३५० मध्ययुगीन चर्च ‘ट्रस्ट’ने सांभाळल्या; कारण पर्यटक येतो, प्रार्थनेला नाही, छायाचित्र काढायला.
३. जर्मनी ?
वर्ष २००० पासून आतापर्यंत साधारण ९६१ चर्च बंद. ६११ कॅथॉलिक आणि ३५० प्रोटेस्टंट आणि भविष्य ? ४४ सहस्र ५०० पैकी एक तृतीयांशच चर्च म्हणून उरतील. बाकी म्युझियम ? (अनुमान आहे)
आकडेवारी बरीच आहे, आपण आपण शोधावी, जरा इकडे तिकडेही असेल.
४. दुसरीकडे बघा
हिंदूंची मंदिरे पाडली गेली. जाळली गेली. सुरूंग लावले. मूर्तींचे नाक छाटले, कान तोडले, हात भंगले. परकीय आले, त्यांनी मंदिरांच्या कळसावर स्वतःचे झेंडे लावले. मूर्ती आत गाडून वर ‘जाहीर हाक’ देण्याची सोय केली – वाटले, आता संपले; पण नाही. तीच मंदिरे पुन्हा उभी रहात आहेत. वीट न वीट जोडली जात आहे. दिमाखात आजही एखाद्या जुन्या मंदिरात किंवा लेण्यांमध्ये गेले की, दगडावर कोरलेला देव दिसतो, नाक तुटलेले, कान भग्न, हात नाही, तरी लोक थांबतात. हात जोडतात. डोळे मिटतात; कारण देव दगडात नसतो, श्रद्धेत असतो. श्रद्धा तलवारीने पसरवता येत नाही किंवा बंदुकीच्या झाडलेल्या गोळीतून मनात रुजवता येत नाही.
आमचा देव स्वार्थी नव्हता. ‘केवळ माझीच पूजा कर, इतरांना नष्ट कर, त्यांना जाळून टाक, त्यांना माझीच पूजा करायला भाग पाड, नाही तर तुझे खरे नाही, तुला स्वर्ग नाही’, असे सांगणारा नव्हता.
आम्ही त्रास भोगले, कदाचित् पुन्हा भोगावे लागतील, भोगू; पण या मातीत, इथल्या आकाशात, नद्यांत, समुद्रात, झाडांच्या पानापानांत, मातीतील कणांत भरून राहिलेले हे देवपण असेच युगानुयुगे टिकून राहील. आपल्या पिढीला हे टिकवण्यासाठी लढता यावे, त्यासाठी लागणारा त्याग करता यावा, पुढच्या पिढीसाठी काही ठेवता यावे, इतकीही प्रार्थना पुरे ! बरोबर ना ?
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (१९.६.२०२६)
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !
(म्हणे) ‘मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास भारतावर टीका करण्यास मागेपुढे पहाणार नाही !’ – US Lawmakers